Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनची जिल्हा न्यायालयात स्वच्छता मोहीम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/06/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
गांधी रिसर्च फाऊंडेशनची जिल्हा न्यायालयात स्वच्छता मोहीम

सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ करण्याचा संकल्प


जळगाव दि. २४ प्रतिनिधी – येथील जिल्हा सत्र न्यायालय आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयूक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या सहकार्यातून स्वच्छता अभियानासह जनजागृती करण्यात आली. ‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ या संकल्पनेवर कार्य करण्याचा संकल्प न्यायालयीन सहकाऱ्यांनी केला. जवळपास ४ टन कचरा संकलित करून महानगरपालिकतर्फे घंटागाडी द्वारे त्याची विल्हेवाट लावण्यात आली.


सकाळ पासून सुरू असलेल्या स्वच्छता उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. पी. सय्यद, कोर्ट व्यवस्थापक जगदिश माळी, अधिक्षक सुभाष एन पाटील, अश्विनी भट, प्रमोद पाटील, अविनाश कुळकर्णी, प्रमोद ठाकरे, हर्षल नेरपगारे, मनोज बन्सी, जावेद एस. पटेल, प्रकाश काजळे, जितेंद्र भोळे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र करंगे, रमेश कांबळे, अर्जून पवार यांच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने मदन लाठी, हेमंत बेलसरे, सुधीर पाटील, तुषार बुंदे व स्वयंसेवक उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या वतीने अनिल जोशी, बाळू साबळे, देवेंद्र पाटील उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानासह पर्यावरणाबाबत जनजागृती केली. प्लास्टीकचा कमीत कमी वापर करण्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर जळगाव, स्वच्छ जळगाव आणि हरीत जळगाव’ या संकल्पनेविषयी सांगितले. यावर न्यायालयीन सहकाऱ्यांनी माझे घर, वॉर्ड, शहर स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगत, त्यावर कार्य करणार असल्याची ग्वाही दिली. नियमित स्वच्छता मोहिमेसाठी पाच ते सहा स्वयंसेवकांची एक टिम करण्याचा मानस यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. त्याला गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे मार्गदर्शन राहिल. येणाऱ्या काळात नियमीत शहराला स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्याचे उपक्रम राबविले जातील असेही यावेळी सर्वांच्या वतीने जाहिर करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आता कोर्टाने एकनाथ खडसेंना ठोठावला दंड ; नेमकं प्रकरण काय?

Next Post

प्रोफेसर डॉ उमेश वाणी यांची ४ विद्यापीठातील अभ्यास मंडळावंर निवड

Next Post

प्रोफेसर डॉ उमेश वाणी यांची ४ विद्यापीठातील अभ्यास मंडळावंर निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d