Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी फाऊंडेशनमध्ये विविध उपक्रमांनी डीएम कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील यांचा वाढदिवस साजरा; हॉर्टिकल्चर विभागातर्फे ११०० केशर आंब्यांचे वृक्षारोपण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/08/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
गोदावरी फाऊंडेशनमध्ये विविध उपक्रमांनी डीएम कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील यांचा वाढदिवस साजरा; हॉर्टिकल्चर विभागातर्फे ११०० केशर आंब्यांचे वृक्षारोपण

जळगाव(प्रतिनिधी)- नागपूर येथून एमबीबीएस तर मुंबई येथून डीएम कार्डियोलॉजीस्टची पदवी संपादन केलेले हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील यांचा आज वाढदिवस.. त्यानिमित्‍त गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच उत्‍तरोत्‍तर आपली प्रगती होवो असे आशिर्वाद ज्येष्ठांनी दिले. यात विशेष म्हणजे हॉर्टिकल्चर येथील ४० गुंठे इतक्या परिसरात वैभव केशर मँगो बागेचे उद्घाटन करण्यात आले असून उत्सवमूर्ती डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते केशर मँगोच्या रोपाची लागवड करण्यात आली. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वाढदिवस उत्साहात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी डीएम कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थीतांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डीन डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, सावदा येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य भारती महाजन, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळच्या प्राचार्य अनघा पाटील, अकाऊंटंट योगेश पाटील, विकास जावळे, विकास बेंडाळे, अनंत इंगळे, संजय भिरुड, परेश पाटील, उमाकांत भिरुड आदि उपस्थीत होते. केक कटिंग करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एच.पाटील, ईश्‍वर जाधव यांनी पुष्पगुच्छ देत डॉ.वैभव पाटील यांना शुभेच्छा दिल्यात.

गट ४० मध्ये केशर आंब्याची लागवड डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्‍त आज डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या परिसरातील गट क्रमांक ४० मध्ये वैभव केसर मँगो बागेत तब्बल ११०० केशर आंब्याची लागवड करण्यात आली. याप्रसंगी रेडिओलॉजिस्ट डॉ.केतकी पाटील, कृषी महाविद्यालयाचे हॉर्टिकल्चर संचालक प्रा.सतीश सावके, परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे, प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, अतुल बोंडे आदि उपस्थीत होते. याप्रसंगी केक कटिंग करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थीतांनी पुष्पगुच्छ देत डॉ.वैभव पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. गोदावरी नर्सिंग आणि डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे किवा तेवन येथे वाढदिवस साजरा गोदावरी नर्सिंग आणि डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांचा वाढदिवस किवा तेवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वरुण राजानेही हजेरी लावत डॉ.वैभव पाटील यांना शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी, डॉ.साकीब सैय्यद, डॉ.चित्रा म्रिधा, डॉ.अमित जैस्वाल, डॉ.अनुराग मेहता, डॉ.भवानी राणा, डॉ.कल्पना देशमुख, डॉ.श्रृती चौधरी, डॉ.प्रज्ञा महाजन, डॉ.निखील पाटील, डॉ.मुकेश शिंदे, डॉ.सुवर्णा सपकाळे, डॉ.चैताली नेवे, डॉ.शैली पारेख, नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रविण कोल्हे, डायरेक्टर शिवानंद बिरादर, मेट्रन संकेत पाटील, प्रा.पियुष वाघ यांच्यासह नर्सिेंग महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्‍तर कर्मचारी उपस्थीत होते. केक कटिंग करुन वाढदिवस साजरा करण्यात आला असून उपस्थीतांनी निरोगी आरोग्य आणि उत्‍तरोत्‍तर आपली प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्यात.डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी, कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात वाढदिवस साजरा डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी, कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये डॉ.वैभव पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी परिसर संचालक डॉ.सुधाकर पाटील यांनी डॉ.वैभव पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. सर्वप्रथम महाविद्यालयातील प्रा.मयुरी देशमुख यांनी डॉ.वैभव पाटील यांचे औक्षण केले. यानंतर केक कटिंग करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.सुधाकर पाटील यांनी भविष्य व वर्तमान काळाचा विचार करुन पुढील वाटचाल करत राहावी व संस्थेस यशाच्या उंच शिखरावर न्यावे अशी अपेक्षा व्यक्‍त केली तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी मनसपासून सहकार्य करतील अशी ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.पी.आर.सपकाळे, डॉ.शैलेश तायडे, डॉ.एस.एम.राठी, प्रा.सतीश सावके, प्रा.प्रविण देवरे, डॉ.कुशल ढाके, अतुल बोंडे उपस्थीत होते. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या तिन्ही महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. सूत्रसंचालन प्रा.मोनिका नाफडे-भावसार यांनी तर आभार प्रा.मयूरी देशमखु यांनी मानले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प.वि.पाटील विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी विविध स्पर्धांनी साजरी

Next Post

कोरोना काळातील एकल/विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तालुकास्तरीय ‘समाधान शिबिर’ घ्यावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Next Post
कोरोना काळातील एकल/विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तालुकास्तरीय ‘समाधान शिबिर’ घ्यावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

कोरोना काळातील एकल/विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तालुकास्तरीय ‘समाधान शिबिर’ घ्यावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d