जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल जळगाव मध्ये आजपासून आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आगमन झाले असून विद्यार्थ्यांवर स्कूलच्या प्रवेशद्वार जवळ फुलांचा वर्षाव केला.

याप्रसंगी गोदावरी स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी सरस्वती पूजन केले. विद्यार्थ्यांनीसुध्दा विद्येची देवता असलेल्या सरस्वतीचे पूजन, वंदन करुन आलेले कोरोनाचे संकट निरसन होवो व शालेय जीवन सुरळीत होवो ही प्रार्थना केली. यावेळी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. संपूर्ण कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करू आदल्या दिवशीच सर्व स्कूल परिसर सॅनीटाईज करण्यात आला. जागोजागी सूचना फलक लावण्यात आले. सोशल डिस्टंसिंगचे पालन व स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांचे अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लित वातावरणात स्वागत करण्यात आले.










