Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामीण भागातील उद्योगांना प्राधान्याने वीज देण्याचे नियोजन – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ग्रामीण भागातील उद्योगांना प्राधान्याने वीज देण्याचे नियोजन – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

भंडारा(प्रतिनिधी)- शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. महाविकास आघाडी शासनाकडून जगाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची ग्वाही देतो. राज्यातील ग्रामीण भागात शेतीसह औद्योगिक विकास होणे गरजेचे आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी ग्रामीण भागात उद्योग उभारावे लागतील. उद्योगासाठी वीज आवश्यक आहे. त्या दिशेने शासनाच्या वतीने नियोजन सुरू आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

तुमसर तालुक्यातील माडगी येथील 33/11 के.व्ही उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बंडू वासनिक, अधिक्षक अभियंता भंडारा राजेश नाईक, भंडारा महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड, माडगीचे संरपंच गौरीशंकर पंचबुधे, प्रेमसागर गणविर तसेच पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.भंडारा व गोंदिया हे जिल्हे मानव विकास निर्देशांकामध्ये मागे पडलेले आहेत. या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबध्द आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे अनेक विकास कामे मंदावली आहेत. या काळातही अनेक दिवसांपासून माडगी परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता महावितरण विभागाच्या वतीने माडगी येथे 33/11 के.व्ही. उपकेंद्र निर्मिती झाली असून त्याचा लोकार्पण करताना मला आनंद होत आहे, असे ते म्हणाले.माडगी उपकेंद्रामुळे जवळपासच्या 10 गावातील 1 हजार शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी व औद्योगिक तसेच इतर 4 हजार ग्राहकांना गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा मिळण्यास मदत होईल. यामध्ये कृषी पंपासाठी एक वेगळा फिडर उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा उपलब्ध होईल. शेती व उद्योगाच्या विकासातून गावाचा विकास होतो. नव्या उद्योगांसाठी गांभीर्याने लक्ष घालून माडगी येथील उपकेंद्रात तीन फिडर दिलेले आहेत. माडगी येथील उपकेंद्राच्या माध्यामातून आपली विकासाची वाटचाल चालू राहील, असे त्यांनी सांगितले.महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले.

माडगी येथे 132 के.व्ही. उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून 16 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मर व्दारे 11 के.व्ही. स्वीचींग स्टेशनच्या माध्यमातून जवळपास 10 गावांना वीज पुरवठा होत होता. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना अखंडीत व योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळावा यासाठी पूर्व विदर्भीय योजनेअंतर्गत माडगी येथे 33/11 के.व्ही. उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेद्रास उभारणीसाठी जवळपास 4.5 कोटी रुपये खर्च झालेला आहे, असे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. नागरिकांनी वीज बिल भरा व थकबाकी मुक्त व्हा, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती फटे व रेशमा नंदनवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांनी मानले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Next Post

जळगाव जिल्हा हॉकी असोसिएशन व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे उद्या क्रीडा पुरस्काराचे वितरण; जिल्ह्यातील खेळाडुंंचा करणार गौरव

Next Post

जळगाव जिल्हा हॉकी असोसिएशन व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे उद्या क्रीडा पुरस्काराचे वितरण; जिल्ह्यातील खेळाडुंंचा करणार गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d