Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्राहकांनी वस्तु खरेदी करतांना पावती घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
ग्राहक हक्क संरक्षण कायदा म्हणजे नेमके काय ?

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

जळगाव, दि. 14 – ग्राहकांनी आपली फसवणुक होवू नये याकरीता बाजारातून महत्वाच्या वस्तुंची खरेदी करतांना त्याची पावती (बील) घ्यावी. जेणेकरुन भविष्यात ती वस्तु गॅरटी/वॉरंटी कालावधीत खराब निघाल्यास बदलून घेता येणे सोईचे होते. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले.

            जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यो. को. बेंडकुळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, वैधमापन शास्त्र विभागाचे अ. आ. जगताप, दूरसंचार विभागाचे एस. डी. उमराणी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांचेसह अशासकीय सदस्य विकास महाजन, डॉ.अर्चना पाटील, सौ.पल्लवी चौधरी, ॲड.मंजुळा मुंदडा,

साहित्यिक अ. फ. भालेराव, रमेश सोनवणे, बाळकृष्ण वाणी, कल्पना पाटील, नरेंद्र पाटील आदि उपस्थित होते.

            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, अनेक नागरीक वस्तु खरेदी करतांना बील घेत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. तसेच वस्तु खराब निघाल्यास व बील नसल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात अडचणी येतात. त्यामुळे नागरीकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी विक्रेत्याकडे बीलाची मागणी करावी. शहरात अनोंदणीकृत अनेक रिक्षा आढळून येतात. त्यांचेवर कारवाई सुरु असूनआतापर्यत परिवहन विभागाने 200 रिक्षांवर कारवाई केल्याची माहिती सहायक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी बैठकीत दिली. तसेच ज्या रिक्षांची नोंदणी केलेली नाही अशा रिक्षा तातडीने स्क्रॅप करण्यात येत असल्याचेही बैठकीत सांगितले. अनेक रिक्षाचालक परवानगीपेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नागरीकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविताना तसेच जे रिक्षाचालक नियमांचे पालन करतात. त्यांच्याच रिक्षातून पाठवावे. अथवा शाळेच्या स्कुलबसमधूनच पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी बैठकीत केले.

            ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून कार्यवाही सुरु आहे. यानंतरही काही नागरीकांची फसवणूक होत असल्यास त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी मागील  बैठकीत अशासकीय सदस्यांनी केलेल्या तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. यामध्ये नोंदणी नसलेल्या खाजगी कोचिंग क्लासेसवर बंदी  आणणे, चायनीज खाद्यपदार्थांची तपासणी करणे, ठेवीदारांच्या पतसंस्थाकडे अडकलेल्या ठेवी परत मिळणे आदि विषयांचा समावेश होता.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

धान्य वितरणाच्या तक्रारी व्हॅटसॲपवर स्वीकारणार- जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

नाफेडच्या मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्रासाठी;इच्छूक संस्थांनी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे

Next Post

नाफेडच्या मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्रासाठी;इच्छूक संस्थांनी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d