Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स खो-खो, कबड्डी व बॉस्केटबॉलचा संघ निवडण्यासाठी चाचणीचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स खो-खो, कबड्डी व बॉस्केटबॉलचा संघ निवडण्यासाठी चाचणीचे आयोजन

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- केंद्र शासनाच्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स (18 वर्षाखालील मुले व मुली) 2022 चे आयोजन हरियाणा येथे करण्याचे निश्चित झाले आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचे खो-खो व कबड्डी या खेळाच्या मुले व मुली तसेच बास्केटबॉलच्या मुलींचा संघ पात्र ठरला आहेत. त्यानुसार राज्याचा संघ निवड करण्यासाठी अनुक्रमे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर खो-खो व कबड्डी या खेळाच्या क्रीडा स्पर्धां व निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्यानुसार जिल्हास्तरावर खो-खो या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन 22 ते 23 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले असुन या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीकरिता सहभागी संघ व खेळाडुनी 22 नोव्हेबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे.

तसेच जिल्हास्तरावर कबड्डी या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन 23 व 24 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत ॲड एस. ए. बाहेती महाविद्यालय, जळगाव येथे करण्यात आले असुन या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीकरिता सहभागी संघ व खेळाडुनी 23 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे.

कबड्डी खेळासाठी मुलांकरीता वजनगट 70 किलो किंवा त्यापेक्षा कमी व मुलींसाठी वजनगट 65 किलो किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच बास्केटबॉल या खेळाचे मुलींच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन जिल्हास्तरावरुन थेट राज्यस्तरावर करण्यात येणार असून जिल्हास्तरावर 26 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. बास्केटबॉल या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीतील सहभागी खेळाडुमधुन जिल्ह्याचा संघ राज्यस्तरावर सहभागी होण्याकरिता निवडला जाणार आहे. या स्पर्धा संघटनेच्या नियमानुसार होतील व स्पर्धेत सहभागी खेळाडुंना कोणत्याच स्तरावर प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना व क्रीडा मंडळे यांनी जिल्हास्तर खो खो, कबड्डी व बास्केटबॉल या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीत सहभागी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त संघ व खेळाडुना सुचित करावे, या स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडुची जन्मतारीख ही 1 जानेवारी, 2003 किंवा त्यानंतरची असावी. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना व क्रीडा मंडळे यांनी खेळाडुंचे संपुर्ण नाव, जन्मदिनांक, आधारकार्ड, शालांत प्रमाणपत्र, 10 वी बोर्ड सर्टिफिकेट, जन्मप्रमाणपत्र (5 वर्षापुर्वी काढलेले) यापैकी दोन कागदपत्रे, पत्रव्यवहाराचा पत्ता व संपर्क क्रमांकासह लेटर हेडवर सही व शिक्क्यासह प्रवेशिका 20 नोव्हेंबर, 2021 पर्यंत संपुर्ण कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे सादर करावे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात- 8625946709 यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

Next Post

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून मुंबईतून एकाला अटक

Next Post
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून मुंबईतून एकाला अटक

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून मुंबईतून एकाला अटक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d