Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात २६ फेब्रुवारीला भरणार मराठी गझल लेखन कार्यशाळा;गझल मंथन साहित्य संस्थेचा उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/01/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
जळगावात २६ फेब्रुवारीला भरणार मराठी गझल लेखन कार्यशाळा;गझल मंथन साहित्य संस्थेचा उपक्रम

जळगाव- (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे रविवार, दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी जळगावात एक दिवसीय नि:शुल्क मराठी गझल लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. याप्रसंगी महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा मराठी गझल मुशायरा देखील होणार आहे.

पहिल्या सत्रात होणाऱ्या गझल लेखन कार्यशाळेत नवोदित गझलकारांना सुप्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड, सुप्रसिद्ध गझलकार निलेश कवडे, सुप्रसिद्ध गझलकार शांताराम (शाम) खामकर हे मार्गदर्शन करणार आहेत. जळगाव येथील वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात ही भव्य गझल लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. कार्यशाळेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. मर्यादित जागा असल्याने कार्यशाळेत प्रथम नाव नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. गझल लेखन शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनी ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या (88065 44472) या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाॅटस्अॅपद्वारे नाव नोंदणी करावी. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला सहभाग प्रमाणपत्र तसेच प्राविण्य प्राप्त करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

यानंतर दुपारच्या दुसऱ्या सत्रात मान्यवर गझलकारांचा मुशायरा होणार आहे. नवोदित गझलकारांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धी प्रमुख भरत माळी, खानदेश उपविभाग प्रमुख ॲड. मुकुंदराव जाधव आणि जळगाव जिल्हा अध्यक्ष डाॅ शकुंतला चव्हाण, उपाध्यक्ष छाया सोनवणे, सदस्या आशा साळुंखे, शिवाजी साळुंखे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक चे उत्साहात उद्घाटन

Next Post

राष्ट्रीय युवा संसद मध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा ;जिल्हा युवा अधिकारी नरेन्द्र यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d