Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव पिपल्स बँकेच्या चेअरमनसह अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव पिपल्स बँकेच्या चेअरमनसह अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल

पत्रकारांना जीवे ठार मारण्याची धमकी;बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटलांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

  • पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांना निवेदन सादर करतांना पत्रकार संघटनेचे पदाधिकारी

जळगाव-(प्रतिनिधी) -येथील दि जळगाव पिपल्स को-ऑप बँकेच्या चेअरमनसह ७ अधिकारी व कर्मचार्‍यांवर शहर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकारांना धमकावणे व बँकेच्या विरुध्द बातम्या प्रसिध्द करु नये यासाठी आटापिटा करणार्‍या चेअरमन भालचंद्र पाटील सह ७ अधिकार्‍यांविरुध्द  गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांचे व नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी येथील दि जळगाव पिपल्स को-ऑफ बँकेस रिझर्व्ह बँकेने २५ लाखाचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी दै. बातमीदारसह बहुसंख्य प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाने वस्तुस्थिती जन्य बातम्या प्रसारीत केल्या होत्या व यासंदर्भात बँकेचा खुलासा देखील प्रसिध्द केला होता. याचा राग येऊन, आकस बुध्दिने दि. ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी दै. बातमीदारचे संपादक हेमंत पाटील यांच्या विरुध्द शहर पोलीस स्टेशनला खोटी फिर्याद देवून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार बँकेचे चेअरमन संचालक मंडळ व प्रशासनाने केला असल्याचे हेमंत पाटील यांनी साांगितले. तसेच सोशल मिडियावर यासंदर्भातील पोस्ट व्हायरल करुन बँकेच्या प्रशासनाने आकांडतांडव करीत या प्रकारच्या बातम्या प्रसिध्द केल्यास बँक प्रशासनाकडून अप्रत्यक्षपणे कायदेशीर कारवाईची धमकी देत बँक ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणार्‍या बातम्या प्रसिध्द करु नये या कारणास्तव वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार केला असल्याचे देेखी त्यांनी सांगितले.  या प्रकरणी दै.बातमीदार चे संपादक हेमंत पाटील यांनी शुक्रवार दि. १ नोव्हेंबर २०१९ रोजी फिर्याद दिल्याने चेअरमन भालचंद्र पाटील, दिलीप देशमुख, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, राजेंद्र सोनार, सतिष लिंगे, सागर बारी व अन्य एका विरुध्द भादंवि कलम १४३, ३२३, ५०१, ५०४, ५०६ प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय उल्हास चर्‍हाटे हे पुढील तपास करीत आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रचाराच्या झंझावातानंतर शरद पवार पुन्हा मैदानात;पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Next Post

“आलीया भोगासी” – दीपक तांबोळी

Next Post
“आलीया भोगासी” – दीपक तांबोळी

"आलीया भोगासी" - दीपक तांबोळी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d