जळगाव-(प्रतिनिधी)-येथे दिनांक 27/ 9/ 2019 शुक्रवार रोजी निवडणूक आयोगाच्या वतीने तहसीलदार कार्यालयातून नामनिर्देशन अर्ज उमेदवारांना वितरित करण्यात आले. श्री अनिल पितांबर वाघ (सर) यांनी आम आदमी पक्षाच्या वतीने पहिल्याच दिवशी उमेदवारी नामनिर्देशन फॉर्म घेतले. व पहिल्या दिवशी अनामत रक्कम रुपये 5000 भरून पावती स्वीकारली आहे. विशेष म्हणजे आज कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अनामत रक्कम भरलेली नाही ती फक्त आप पक्षाच्या उमेदवाराने आगावू रक्कम भरली आहे. श्री अनिल पितांबर वाघ यांना उमेदवार म्हणून घोषित होणे बाकी असले तरी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

आप पक्ष श्री अनिल पितांबर वाघ यांच्याकडे उच्चशिक्षित , निर्व्यसनी, निगर्वी, व सामान्यातील सामान्य उमेदवार म्हणून उमेदवारी देणार आहे. श्री अनिल वाघ यांना स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा भरपुर पाठिंबा आहे. पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे श्री अनिल वाघ यांच्या उमेदवारी करिता मागणी लावून धरलेली आहे. राज्यभरातील दुसरी यादी लवकरच जाहीर होणार आहे या यादीत जळगाव शहराचे उमेदवार श्री अनिल वाघ असणार आहे असे जिल्हा युवाअध्यक्ष रईस खान व उपशहार प्रमुख योगेश भाऊ हिवरकर वार्ताहरास कळवितात.

श्री अनिल वाघ हे राजकीय, व सामाजिक क्षेत्रात सर्वांनाच परिचित आहेत. अतिशय प्रामाणिक व मनमिळावू स्वभावाचे असल्याने जनमाणसात ते प्रवीण मामा या नावानेसुद्धा ओळखले जातात. आप पक्षाच्यावतीने सर्वसामान्यांच्या गरजा, समस्या, आरोग्य, शिक्षण व मोफत 200 युनिट रीडिंग बिल तसेच 2000 लिटर मोफत पाणी मतदारांना देणे यासाठी आम आदमी पक्षाच्या दिल्ली मॉडेल नुसार देतील. जळगाव शहरातील तमाम मतदार बंधू भगिनी त्यांना सदिच्छा व शुभेच्छा मतदान रूपात त्यांना भरघोस मतदान देतील मतदार बंधू भगिनी त्यांच्या उमेदवारीस सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांना पाठिंबा देत आहेत.











