Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेरात राष्ट्रीय लसीकरण दिवस व आशा दिन उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेरात राष्ट्रीय लसीकरण दिवस व आशा दिन उत्साहात संपन्न


जामनेर – (प्रतिनिधी) – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय लसीकरण दिवस व आशा डे साजरा करण्यात आला.लसीकरणा बद्दल जागरूकता करण्यासाठी मार्च महिन्यात राष्ट्रीय लसीकरण दिनाचे आयोजन करण्यात येते. तसेच वर्षभर कामकाज करणाऱ्या आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने आशा डे साजरा करण्यात येतो.


या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पोलिओ लसीकरण मोहीम , कोरोना लसीकरण मोहीम व नियमित लसीकरण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच महिला दिनानिमित्त महिला पत्रकार मीनल चौधरी,मीना शिंदे,आश्विनी चौधरी, प्रा.शीतल पाटील,ललिता गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईश्वरलाल जैन बँकेचे चेरमन एवं सामाजिक कार्यकर्ते कचरूला बोहरा तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.समाधान वाघ, प्रजपिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या ब्रम्हकुमारी सुषमा दीदी, जामनेर डॉक्टर संघटनेचे डॉ. प्रशांत भोंडे,जामनेर तालुका निमा चे अध्यक्ष डॉ. नंदलाल पाटील, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी पद्म परदेशी, निशा तेली हे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर सूत्र संचलन रवींद्र सूर्यवंशी यांनी केले.डॉ.पल्लवी राऊत यांनी आभार मानले.कार्यक्रमात १४ वैद्यकीय अधिकारी,१ प्रयोगशाळा अधिकारी,१ औषध निर्माण अधिकारी,३ आरोग्य सहाय्यीका,८आरोग्य सेविका,३ गटप्रवर्तक, ४० आशा,३५ अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.कोमल देसले, डॉ.मनोज पाटील,डॉ.मनोज तेली,डॉ.दानिश खान, डॉ.शुभम सावळे,बशीर पिंजारी, आशा कुयटे,शिवली देशमुख, अनुराधा कल्याणकर,प्रदीप पाटील,व्ही.एच.माळी अंगणवाडी पर्यवेक्षिका पुष्पा धनगर,शीला पाटील,शोभा पाटील,भरती भिसे,जया नाईक,वाकोडे गोकर्णा, आशा तेजकार व सर्व गटप्रवर्तक यांचे अनमोल सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा उत्साहात साजरा..!

Next Post

बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कर्णधारपदी सतत तिसऱ्यांदा आकाश धनगर ची निवड

Next Post
बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कर्णधारपदी सतत तिसऱ्यांदा आकाश धनगर ची निवड

बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कर्णधारपदी सतत तिसऱ्यांदा आकाश धनगर ची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d