Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण समितीची मासिक बैठक अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, अन्न औषध प्रशानाचे सहाय्यक आयुक्त ये. को. बेंडकुळे, वैद्यमापन शास्त्र विभागाचे राजेंद्र बांगर, दुरसंचार निगमचे उपमंडल अधिकारी एस. डी. उमराने, राज्य वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राजेश पाटील, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्रतिनिधी डॉ. एम. पी. बावणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डी. आर. चौधरी यांच्यासह अशासकीय सदस्य विकास महाजन, बाळकृष्ण वाणी, विजय मोहरीर, पल्लवी चौधरी, ॲङमंजूळा मुदडा, सौ. उज्वला देशपांडे, नरेंद्र पाटील आदि उपस्थित होते.       

            याप्रसंगी धान्य वितरणाबाबत समितीच्या अशासकीय सदस्यांनी नागरीकांना येत असलेल्या अडचणी बैठकीत मांडल्या. याची तातडीने दखल घेवून अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांनी त्या संदर्भात संबंधितांना सूचना दिल्यात. वितरणासंबंधीच्या तक्रारींसाठी नागरीकांना तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून अर्जाद्वारे आपल्या अडीअडचणी मांडाव्या लागतात. यामध्ये नागरीकांचा वेळ वाया जातो. तसेच याकीरता त्यांना गावाहून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने अशा तक्रारी व अडीअडचणी सोडविण्यासाठी व्हॅटसॲपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नागरीकांनी आपला वेळ व पैसा वाचवण्यासाठी व्हॅट्सॲप सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

             बैठकीत शाळा महाविद्यालयांमध्ये वॉटर बेल उपक्रम राबविणे, महानगरपालिका, नगरपालिकेच्या करदात्यांना सोयी/सुविधा उपलब्ध करुन देणे, रेल्वे स्टेशनवरील डिसप्ले बोर्डमुळे जेष्ठ नागरीकांचे होणारे हाल, विविध शासकीय, खाजगी रुग्णालयांमधील अस्वच्छतेचा प्रश्नांवर अशासकीय सदस्यांनी चर्चा केली. या बाबी तात्काळ निकाली काढून ग्राहकांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवता कामा नये. अशा सूचनाही शेवटी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सर्व उपस्थितांना दिल्यात.

            शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच अशासकीय सदस्यांकडून आलेल्या सर्व सूचनांवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल असे सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

नाना शंकरशेठ पुरस्कार सोहळा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात संपन्न

Next Post

नाना शंकरशेठ पुरस्कार सोहळा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d