Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा प्रशासन व गणपती हॉस्पिटल आस्थापनाशी समन्वय साधण्यासाठी सुनील धोंडगे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 16 (जिमाका) – कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपलब्ध असलेली आयसीयू बेडची क्षमता अपुरी पडण्याची शक्यता आहे. याकरीता 13 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये गणपती हॉस्पिटल, आकाशवाणी चौक हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले

            जिल्हा प्रशासन व गणपती हॉस्पिटल, जळगाव या डेडीकेटेड हॉस्पिटलमधील आस्थपना यांच्याशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून सुनील धोंडगे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी यांना सहाय्य करणेसाठी हेमंत पाटील, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, जळगाव व श्रीकांत माटे, अव्वल कारकुन, तहसील कार्यालय, जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे

            नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक यांनी गणपती हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून काम सुरू करण्याअगोदर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आयसीयू व्यवस्था, ऑक्सीजन साठा, वीज मीटर्स रीडिंग, बेड संख्या व इतर अनुषंगिक उपलब्ध असलेले सर्व वैद्यकीय उपकरण, सामग्री व साठा यांचे व्हिडिओ शूटिंग करण्यात यावे तसेच सर्व उपलब्ध साधनसामग्री, साठा यांची स्वतंत्र नोंद ठेवावी

         नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक यांनी गणपती हॉस्पिटल, जळगाव या हॉस्पिटलच्या आस्थापनेशी समन्वय साधणे. वेळोवेळी सर्व वैद्यकीय साधनसामग्री, उपकरणे यांची उपलब्धता व आवश्यकता याबाबत सविस्तर नोंद ठेवावी, तसेच हॉस्पिटलच्या बाबतीत उद्भवणाऱ्या सर्व प्रशासकीय अडीअडचणी सोडण्याबाबत सर्व संबंधिततांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी व त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी यांना सादर करावे.

            या आदेशाचे उल्लंघन अथवा भंग केल्यास सदर बाब ही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी आदेश निर्गमित केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ए.पी.आय. कै.अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post

राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला ५०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी

Next Post
कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न

राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला ५०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d