Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील सोयीसुविधांचे नियंत्रण व समन्वय ठेवण्यासाठी गोरक्ष गाडीलकर आणि सतीष कुलकर्णी यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दि. 13 – कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता, जळगाव जिल्हयातील कोविड केअर सेंटर, (Covid Care Centres) कोविड हेल्थ सेंटर, (Covid Health centres) डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (Dedicated Covid Hospitals) मधील सोयीसुविधांच्या अनुषंगाने नियंत्रण व समन्वय ठेवण्याकरीता तसेच रुग्णांना यथोचित आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी शहरी व ग्रामीण भागाकरीता सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.


सतीष कुलकर्णी, आयुक्त, जळगाव महानगर पालिका यांना महानगरपालिका कार्यक्षेत्राकरीता आरोग्य सुविधांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करणे व सर्व संबंधीत यंत्रणा, घटक यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याकरीता Incident Commander म्हणून घोषीत केले आहे. तर गोरक्ष गाडीलकर, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समीती यांना जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरित जळगाव जिल्हा (नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रासह) कार्यक्षेत्राकरीता जिल्हा आरोग्य सुविधांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करणे व सर्व संबंधीत यंत्रणा, घटक यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याकरीता “Incident Commander” म्हणून घोषीत केले आहे.
Incident Commander यांनी “Covid Care Centres” करीता एका अधिका-याची स्वतंत्र नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांनी वेळोवेळी “Incident Commanders” याचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी.
“Incident Commander” यांनी Containment Zone म्हणून घोषीत करण्यात आलेल्या क्षेत्राकरीता एका अधिका-याची स्वतंत्र नोडलअधिकारी म्हणून नियुक्ती करावी. नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांनी वेळोवेळी “Incident Commanders” यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. “ Incident Commanders” यांनी त्रिस्तरीय रचनेकरीता आवश्यक ते मनुष्यबळ, खाजगी रुग्णालये, साधनसामग्री व उपकरणे, रुग्णवाहीका, शासकीय व खाजगी वाहने, शववाहिका आवश्यकतेप्रमाणे अधिग्रहित करावेत. तसेच Covid-१९ च्या अनुषंगाने वेळोवेळी आवश्यक असणारे सर्व आदेश/निर्देश/सुचनाचे स्तरावरुन संबंधितांना ‍निर्गमित करण्यात यावेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार “ Incident Commanders” यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये, कोणत्याही शासकीय/निमशासकीय/ खाजगी आस्थापना/ यंत्रणा, अत्यावश्यक सेवांशी संबंधीतांवर नमूद कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे अधिकार संबंधीत “Incident Commanders” यांना राहतील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण‍ डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आपत्तीवर मात करण्यासाठी तालुकास्तरावरील सर्व यंत्रणा कार्यान्वित करावी-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी दहा कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जळगावात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज आणखी दहा कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d