Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन हिल्सला 4 व 5 जूनला आठवे वार्षिक संम्मेलनाचे दुसरे सत्र ;महाराष्ट्र, गुजरातमधील १३५ शाळांमधून ८०० विद्यार्थ्यांचा सहभाग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांच्या नवीन पिढीला, कृषिउद्योजकांना चालना देणाऱ्या फालीचे जैन हिल्सला १ ते ५ जून दरम्यान आठवे वार्षिक संम्मेलनाचे आयोजन

जळगाव, दि. 3 (प्रतिनिधी) – शेतकरी व कृषिउद्योजकांच्या पुढच्या पिढीला चालना देण्यासाठी फाली औद्योगिक जगतातील नायकांना एकत्रित आणत आहे. त्यासाठी जैन हिल्स येथे फाली आठव्या संम्मेलनाचा पहिले सत्र १ व २ जून ला यशस्वी पार पडले. या संम्मेलनाचे दुसरे सत्र ४ व ५ जूनला घेतले जात आहे. या दुसऱ्या सत्रामध्ये उर्वरित ४०० विद्यार्थी सहभागी होत आहेत. या संम्मेलनासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील १३५ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांमधून ८०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. फालीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. भारताच्या शेतीतील भविष्याचे प्रगतीशील नायक म्हणून अडीच (२५,०००) लाख फाली नायक तयार होतील अशी खात्री आयोजकांना आहे.

आधुनिक शेती, कृषी व्यवसाय तसेच ग्रामीण विकास ह्या क्षेत्रात कार्यरत असलेले त्यासोबत उच्च शिक्षण घेणाऱ्या सहा फालीच्या माजी विद्यार्थ्यांची यासाठी खास उपस्थित असेल. फाली शाळांमधील संवादात्मक शिक्षण, प्रात्यक्षिके, क्षेत्रभेटी, वेबिनार, बिझनेस प्लॅन आणि इन्होवेशन स्पर्धा या सर्वांसाठी जबाबदार असलेले ७० हून अधिक ए. ई. (अॅग्रिकल्चर एज्युकेटर) जे बी.एस्सी आणि एम.एस्सी कृषि पदविधर आहेत. त्यांचीही याठिकाणी उपस्थिती असेल. फाली ९ व त्यानंतर फालीला ज्या कंपन्या पुरस्कृत करतील अशा कंपन्या आणि बँकांचे ज्येष्ठ व्यवस्थापक आणि ३० हून अधिक प्रतिनिधीसुद्धा यात उपस्थित राहतील. सध्या जैन इरिगेशन, गोदरेज अॅग्रोव्हेट, यूपीएल, स्टार अॅग्री आणि ओम्निव्होर या कंपन्या फालीला पुरस्कृत करतात. जैन इरिगेशन फालीच्या आठव्या संम्मेलनाचे यजमान आहेत. भविष्यात फालीला प्रायोजित करू शकणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा रॅलीज, महिंद्रा, आइटीसी, अमूल आणि दीपक फर्टिलायझर यांचा समावेश आहे. फालीच्या संचालक मंडळात कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये नादीर गोदरेज (अध्यक्ष फाली व गोदरेज ग्रुप), रजनिकांत श्रॉफ अध्यक्ष यूपीएल, अनिल जैन उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन, नॅन्सी बेरी – उपाध्यक्ष असोसिएशन फॉर फाली. फाली उपक्रमाचा विस्तार २५ टक्के प्रती वर्ष या वेगाने केला जाईल.

फालीचा गेल्या आठ वर्षातील प्रभाव – संवादात्मक शिक्षण, क्षेत्रभेटी, बिझनेस प्लॅन आणि इन्होवेशन स्पर्धा, आधुनिक शेती आणि कृषितील व्यावसायिक ज्ञान याद्वारे फाली हा एक अद्वितीय आणि अतिप्रभावशील कार्यक्रम म्हणून संस्थापित झालेला आहे. जो नवीन पिढीला शेतीक्षेत्राकडे आकर्षित करत आहे. फालीची अनुभवी टीम, ए.ई. इ. ८ वी, ९ वीच्या विद्यार्थ्यांना परस्पर संवाद आणि प्रात्यक्षिके या द्वारे आधुनिक आणि शाश्वत शेती, कृषिउद्योग, यांचे शिक्षण देतात. अधिक माहिती युट्युबवर https://youtu.be/4IbrCqYfOHw या लिंकवर पाहता येईल.

जे विद्यार्थी कृषी किंवा शास्त्र विषयातील उच्च शिक्षण घेत असतील, कृषी व कृषीपुरक क्षेत्रात कार्यरत आहेत अशा माजी फाली विदयार्थ्यांना इंटरशिप म्हणून, शिष्यवृत्ती आणि कृषि व्यवसायासाठी प्रारंभीक निधी पुरविण्याच्या कार्यक्रमाला संचालकांनी मान्यता दिली आहे. हा कार्यक्रम इ. ८ वी व ९ वीतील विद्यार्थ्यासोबत फाली अभ्यासाला बळकटीकरण देईल आणि फाली आयुष्यभर विद्यार्थ्यांसोबत राहील.

फाली संमेलनामध्ये ४ जून रोजी विद्यार्थी फळबागेच्या लागवड पद्धती, शिवारफेरी, टिश्यूकल्चर, सोलर पार्क, बायोपार्क, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, आर अॅण्ड डी, सिंचन प्रकल्प, गांधीतिर्थ यासह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतील. प्रगतीशील शेतकऱ्यांबरोबर जैन हिल्सवर सुसंंवाद साधतील. फाली विद्यार्थ्यांचे गट त्यांचे कृषि व्यवसाय योजना आणि इन्होवेशन मॉडल्स ५ जून रोजी सादर करतील. यातील विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल. यावेळी फाली उपक्रमाला पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक आणि प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतील. या संम्मेलनाच्या समारोपाला अर्थात ५ जून ला जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज अॅग्रोव्हेटचे बुर्जीज नादीर गोदरेज या मान्यवरांचे मुख्य भाषण होईल.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

यावल वनविभागाकडुन अतिक्रमण मोहीम राबवुन लाकडी झोपड्या नष्ट करीत निर्मुलन-सहा. वनसंरक्षक प्रथमेश हाडपे

Next Post

सायकल रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धन व सदृढतेचा संदेश

Next Post
सायकल रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धन व सदृढतेचा संदेश

सायकल रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धन व सदृढतेचा संदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d