Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता;संपूर्ण भारतातून आठ संघांचा सहभाग, पहिल्याच प्रयत्नात जैन सुप्रिमोज संघाची बाजी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2025
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता;संपूर्ण भारतातून आठ संघांचा सहभाग, पहिल्याच प्रयत्नात जैन सुप्रिमोज संघाची बाजी

डेक्कन प्रीमियर कॅरम लीग मध्ये विजयी ठरलेल्या जैन सुप्रिमोज संघाला चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविताना मान्यवर

जळगाव -(प्रतिनिधी) – डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन-3 भव्य पद्धतीने संपला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या ‘जैन सुप्रिमोज’ कॅरम संघाने पहिल्यांदाच सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्न अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत विजय खेचून आणला. संपूर्ण भारतातून आठ संघ या स्पर्धेत होते. त्यातील स्ट्राईकफोर्स संघाला अंतिम सामन्यात ३-२ अशा फरकाने नमवित निमाखात विजेतेपदाला ‘जैन सुप्रिमोज’ संघाने गवसणी घातली.

विशाखापट्टणम् येथील एसथ्री स्पोर्टस एरिना येथे डेक्कन प्रिमियर कॅरम लीग स्पर्धा दि. १७ ते १९ जानेवारी दरम्यान संपन्न झाली. जैन इरिगेशनच्या ‘जैन सुप्रिमोज’ संघात कर्णधार संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, गौतम भोई, कु. एम. एस. के. हरिका, झैयद अहमद, नईम अन्यारी, रहिम खान, संघ व्यवस्थापक सय्यद मोहसीन यांचा समावेश होता. तीन दिवसांमध्ये १६५ सामने खेळविली गेलीत. या सीझनमध्ये १२ लाखांची पारितोषिके विजेत्यांना वितरित केले गेले. जैन इरिगेशनच्या जैन सुप्रिमोजने डेक्कन प्रीमियर लिगमध्ये उत्कृष्ठ कौशल्य आणि टीमवर्क दाखवून प्रथम स्थान मिळवले. रोष पारितोषिक व भला मोठ्या चषकाने जैन सुप्रिमोज संघाचा सन्मान करण्यात आला. विजयी संघाचे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जैन सुप्रिमोज संघाचे संघमालक अतुल जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे खेळाडू व प्रशिक्षक यांनी कौतूक केले आहे.

डेक्कन प्रीमियर कॅरम लीग (DPCL) सीझन-३ चे पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कॅरम खेळातील अपवादात्मक प्रतिभा ओळखून डेक्कन प्रीमियर लिगचे अध्यक्ष डॉ. नीरज कुमार संपथी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस व्ही. डी. नारायण उपस्थित होते. ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस भारती नारायण, आंध्रप्रदेश राज्य कॅरम असोसिएशनचे सरचिटणीस एस. के. अब्दुल जलील यांनी स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून काम पाहिले. मान्यवरांनी उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहित केले. विजेत्यांसाठी, अव्वल खेळाडू आणि संघांना संपूर्ण लीगमध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानित केले. जैन सुप्रिमो संघाने प्रथम, द्वितीय स्ट्राइक फोर्स, नव्याभारती स्ट्रायकर्सने तिसरा क्रमांक पटकावला. चार्मी-नार चॅलेंजर्सने अव्वल चार संघांना मागे टाकत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ केतकी पाटील निर्मित संविधान@७५ दिनदर्शिकेचे ना रक्षा खडसेंकडून कौतुक

Next Post

तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे ‘एस’, ‘के पूर्व’, ‘जी उत्तर’ आणि एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बाधित;गळती दुरुस्तीचे कामकाज २४ तासात पूर्ण करण्याचे लक्ष्य

Next Post

तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे 'एस', 'के पूर्व', 'जी उत्तर' आणि एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बाधित;गळती दुरुस्तीचे कामकाज २४ तासात पूर्ण करण्याचे लक्ष्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d