Saturday, January 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिरास प्रारंभ एमडी मेडिसीन व एमसीएच तज्ञांकडून तपासणी व शस्त्रक्रिया; पहिल्याची दिवशी ५५ रुग्णांची नोंदणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिरास प्रारंभ एमडी मेडिसीन व एमसीएच तज्ञांकडून तपासणी व शस्त्रक्रिया; पहिल्याची दिवशी ५५ रुग्णांची नोंदणी

जळगाव(प्रतिनिधी)- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे दि. ६ ते ९ ऑक्टोंबर मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून आजपासून शिबिरास प्रारंभ झाला.

यात पहिल्याच दिवशी ५५ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. येत्या ८ ऑक्टोंबरपर्यंत रुग्णांची नावनोंदणी केली जाणार असून ९ ऑक्टोंबरपासून शस्त्रक्रियांना सुरुवात होईल. शिबिरात एमडी मेडिसीन व एमसीएच तज्ञांकडून तपासणी केली जात असून शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे गरजु रूग्णांसाठी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील यांच्या ९ ऑक्टोबर या वाढदिवसानिमित्‍त ६ ते ९ ऑक्टोंबर हे चार दिवस मोफत तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबीराचे आयोजन करण्यात आले असून त्याला आजपासून सुरुवात झाली. यावेळी रुग्णांनी सकाळपासून रुग्णालयात गर्दी करण्यास सुरुवात केली होती.

यावेळी रुग्णालय प्रशासनाने कोविड नियमांचे पालन करा, अशा सुचना केल्या व सोशल डिस्ट्न्ससिंग पाळले जावे यासाठीही उपाययोजना केल्यात. रुग्णांच्या नोंदणीस सकाळपासून प्रारंभ झाला असून यात पहिल्याच दिवशी ५५ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. डॉ.वर्षा पाटील यांचा वाढदिवसानिमित्‍ताने हे शिबिर घेतले जात असून ८ ऑक्टोंबरपर्यंत रुग्णांची नोंदणी केली जाणार असून ९ ऑक्टोंबरपासून मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तरी रुग्णांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.उल्हास पाटील रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

८ ऑक्टोंबर पर्यंत होणार नोंदणीया महाशिबीरात मुतखडा, नाक-कान-घसा शस्त्रक्रिया, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहे. तसेच जनरल मेडीसीन महाआरोग्य शिबीरात किडनीचे आजार, ब्रेन हॅमरेज, मेंदूज्वर, फुफ्फुसाचे आजार, न्युमोनिया, दमा, क्षयरोग, विषबाधा, लिव्हर, मलेरीया, मोफत डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मेडीसीन शिबीरात ब्रेम हॅमरेजशी संबंधीत उपचारासाठी रूग्णालयात भरती झालेल्या रूग्णांची एमआरआय तपासणी सवलतीत केली जात आहे.

या महाशिबीरात एमसीएच तज्ञ डॉक्टरांकडुन रूग्णांची तपासणी देखील मोफत केली जात आहे. हे शिबीर येत्या ८ आक्टोंबर पर्यंतच राहणार असून शस्त्रक्रिया ९ ऑक्टोबरपासून सुरु होतील. महाशिबीरासाठी विभागनिहाय स्वतंत्र टिम कार्यरत करण्यात आल्या आहेत. रूग्णांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली असुन त्यामुळे शिबीराचा लाभ घेण्यासाठी गरजु रूग्णांनी त्वरीत आशिष भिरूड ९३७३३५०००९ आणि रत्नशेखर जैन ७०३०५७११११ या क्रमांकावर संपर्क साधुन आजच नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आजी-आजोबांसोबत नातवंडांनी साजरा केला जागतिक शिक्षक दिन

Next Post

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडुंची राष्ट्रीय फुटसॉल स्पर्धेसाठी निवड

Next Post
गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडुंची राष्ट्रीय फुटसॉल स्पर्धेसाठी निवड

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडुंची राष्ट्रीय फुटसॉल स्पर्धेसाठी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d