Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

मुंबई दि. २७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत  पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाईन मार्गदर्शन दि.२५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी पुणे च्या https://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे.

पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी वाढवण्यात येईल. दर शनिवारी,रविवारी तसेच शासकीय सुट्टयांच्या दिवशी मार्गदर्शन वर्ग बंद राहतील. पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण ४ अभ्यास घटकांचे दिवसाला २ तास याप्रमाणे ऑनलाईन प्रशिक्षण असेल. प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक असतील.

हे प्रशिक्षण वर्ग बार्टीच्या ‘Barti Online’ या युट्यूब चॅनल वरूनही थेट प्रसारीत करण्यात येतील. प्रशिक्षण परस्परसंवादी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षणामध्ये विषयाचा आवाका, मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न, जास्त प्रश्न विचारले जाणारे घटक अशा घटकांचा सखोल अभ्यास करण्याची पद्धत, वाचन साहित्य,मार्गदर्शकांच्या टिपणे (नोट्स) याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल. उमेदवारांच्या शंकांचे निरसन ई-मेलद्वारे करण्यात येईल.

बार्टी संस्थेद्वारे आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांचा त्यांच्या जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी, समतादूत यांच्या माध्यमातून शारीरिक प्रशिक्षण (मैदानी प्रशिक्षण) वर्ग घेण्यात येईल, असेही बार्टीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण सोहळा

Next Post

राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून “हायवे मृत्यूंजय दूत” योजनेला सुरवात

Next Post
राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून “हायवे मृत्यूंजय दूत” योजनेला सुरवात

राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून "हायवे मृत्यूंजय दूत" योजनेला सुरवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d