Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तोंडाला मास्क न लावणाऱ्या ३४३ जणांविरुध्द गुन्हे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
तोंडाला मास्क न लावणाऱ्या ३४३ जणांविरुध्द गुन्हे

जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाली आहे. याआदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ३ हजार २४२ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली आहे. तसेच मास्क न वापरणाऱ्या ३४३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत देशभर लॉकडाऊन घोषित केलेला आहे.
लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत काही निर्बंध घालून दिलेले आहेत. तरी सुध्दा जिल्ह्यातील काही नागरिक बेफिकिरपणे वागत असून स्वत: बरोबरच दुसऱ्यांच्याही जीवाला कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलिस दलाकडून अशा व्यक्तींवर कारवाईची धडक मोहिम हाती घेतलेली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात विविध कारणांनी भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २६९, २७० आणि २९० तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा २ ते ४ सह आपत्ती व्यवस्थापन कलम ५४(४) आदींचे उल्लंघन करणााऱ्या ३ हजार २४२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन कॅमेºयाचा वापर
त्याचबरोबर जिल्ह्यातील चेकपोस्ट, प्रतिबंधित क्षेत्र, कंटोन्मेंट झोन व महत्वाच्या, गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून तेथील नागरीकांमध्ये जनजागृती करणे, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा वेळेत होण्यासाठी हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत करणे, लॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी मास्क लावणेबाबत जनजागृती करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे. बाजार समितीच्या व इतर गर्दीच्या ठिकाणी होणाºया गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करुन बंदोबस्ताची आखणी करणे, आदी विविध उपाययोजना पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही लॉगडाऊनच्या नियमांचे पालन करुन घरातच रहावे, आवश्यकता भासल्यास स्वत:ची सुरक्षितता पाळूनच घराबाहेर पडावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दुधाला ५ रूपये अनुदान देण्यात यावे -सुशांत कांदळकर

Next Post

दारु प्रकरणी तीन पोलीस बडतर्फ; एक निलंबित

Next Post
दारु प्रकरणी तीन पोलीस बडतर्फ; एक निलंबित

दारु प्रकरणी तीन पोलीस बडतर्फ; एक निलंबित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d