Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिवाळीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी केली महाविद्यालयाची स्वच्छता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

नेहरू युवा केंद्रातर्फे शासकीय आयटीआय जळगावमध्ये स्वच्छता अभियान

जळगाव, दि.२१ – देशभरात स्वच्छ भारत अभियान टप्पा २ ला सुरुवात झाली आहे. जळगावात नेहरू युवा केंद्र जळगाव आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी शासकीय आयटीआय जळगाव परिसरात नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले.

जळगाव जिल्ह्यात केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे स्वच्छ भारत अभियान टप्पा २ राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवित आहेत. वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली असून शुक्रवारी शासकीय आयटीआय जळगाव परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

स्वच्छ भारत अभियानाचे महत्व विषद करून अभियानाला सुरुवात झाली. नेहरू युवा केंद्राचे लेखाकार अजिंक्य गवळी यांनी प्रास्ताविक केले. प्रसंगी शासकीय आयटीआय जळगावचे प्राचार्य एस.एम.पाटील, कार्यालय अधीक्षक बाळासाहेब कुमावत, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दीपक कोळी, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक रोहन अवचारे, हेतल पाटील, गौरव वैद्य आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शासकीय आयटीआय आणि बाहेरील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात एकल वापर प्लास्टिक संकलित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी २० मोठ्या बॅग कचरा संकलित करून घंटा गाडीत टाकला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नेहरू युवा केंद्र व नक्षत्र फाउंडेशन तर्फे मेगा स्वच्छ भारत अभियान 2.0 उपक्रम संपन्न…

Next Post

“समाजकार्याच्या विद्यार्थ्याने” जन्मदिनी राबविला आदर्श उपक्रम

Next Post

"समाजकार्याच्या विद्यार्थ्याने" जन्मदिनी राबविला आदर्श उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d