Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज

मुंबई(प्रतिनिधी)- कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच पर्यटनस्थळे खुली करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. पर्यटक देखील हिवाळी पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासाचे आरक्षण करून पर्यटनाचे नियोजन करू लागल्याचे दिसून येत आहे. गुलाबी थंडीची चाहूल आणि दीपावलीच्या सुट्टीचे वेध लागले असल्याने पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळू लागली असल्याने महामंडळानेही विविध सोयी सुविधा आणि विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.

विविध सोयी सुविधांसह पर्यटकांच्या स्वागतासाठी महामंडळ सज्ज असल्याने पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या www.mtdc.co या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या नवीन संकेतस्थळावरून महामंडळाच्या पर्यटक निवासाचे आरक्षण करता येणार आहे. महामंडळाची नुतनीकरण झालेली पर्यटक निवासे आणि प्रशिक्षित कर्मचारी पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

एमटीडीसीमार्फत विविध घटकांना सवलतीमहामंडळाने हिवाळी पर्यटन आणि दीपावली सुट्टयांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगमध्ये 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहे. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती देण्यात येत आहेत. याबरोबरच 1 ऑक्टोबरपासून ‘कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट’ची सुरूवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.

पर्यटक निवासात पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. उपाहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरून पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर अशी व्यवस्था पूर्वीपासूनच करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

महामंडळाच्या उपहारगृहांमध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून ‘प्री-वेडींग फोटोशूट’ आणि ‘डेस्टीनेशन वेडींग’चीही सोय करण्यात येणार आहे. काही रिझॉर्टवर वायफाय सुविधाही पुरविण्यात येत आहे. त्यामुळे या पर्यटक निवासात राहून मुलांना ऑनलाईन क्लास तर पालकांना ऑनलाइन कामकाजही करता येणार आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे, असे श्री. हरणे यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा हाच आमचा धर्म -रवींद्र चौधरी

Next Post

आदिवासी भगिनींनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी यंदाही राजभवन उजळणार

Next Post
आदिवासी भगिनींनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी यंदाही राजभवन उजळणार

आदिवासी भगिनींनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी यंदाही राजभवन उजळणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d