Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देशभरातील रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार; “शावैम” च्या डॉक्टरांचे राजकोटला चार संशोधन सादर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
देशभरातील रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार; “शावैम” च्या डॉक्टरांचे राजकोटला चार संशोधन सादर

जळगाव(प्रतिनिधी)- रुग्णांवर उपचार करताना अनेकदा अत्याधुनिक सुविधा नसल्याने रुग्णाला मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. गोरगरीब रुग्णांचे तर चांगलेच हाल होत असतात. आता देशभरातील रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार आहे. आपत्कालीन, गुंतागुंतीचे उपचार, इन्फेक्शनचे रुग्ण यांना संशोधनाचा फायदा होईल. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश जाधव यांनी याबाबत गौरवास्पद संशोधन केले आहे.

त्यांनी गुजरात राज्यातील राजकोट येथील प्रसिद्ध प्रयोगशाळेत नामवंत शास्त्रज्ञांसमोर त्यांचे ४ संशोधन सादर केले. देशभरातील अनेक रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळणे अनेकदा दुरापास्त होते. त्यासाठी अनेक डॉक्टर संशोधन करून रुग्णांना उपचार मिळणे सोयीचे व्हावे म्हणून प्रयत्न करीत असतात. डॉ. उमेश जाधव यांनी वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) व अन्य कॉपीराईट संशोधनासाठी राजकोट येथे जाण्यासाठी संधी मिळाली. राजकोट येथील पीएम केअर्स व मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत ज्योती सीएनसी संशोधन व विकास प्रयोगशाळा येथे काम करण्यासाठी परवानगी व सामुग्रीची मान्यता मिळवली. तेथे नामवंत शास्त्रज्ञांसमोर डॉ. उमेश जाधव यांनी संशोधन सादर केले.

शास्त्रज्ञांनी त्यांच्या सर्व संशोधनाचे कौतुक करीत संशोधनात सातत्य ठेवा, प्रगती करा असे सांगितले. या संशोधनानुसार, रुग्णांवर देखरेख ठेवणे व उपचारांमध्ये रुग्ण बरा होण्यासाठी हस्तक्षेप करता येणार आहे. रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार आहे. डॉ. उमेश जाधव यांना प्रकल्पासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. डॉ. उमेश जाधव यांच्या या संशोधन प्रकल्पामुळे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नाव उंचावले असून त्यांच्या यशाबद्दल नूतन अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, शल्यचिकित्सा विभागातील डॉ. प्रशांत देवरे, डॉ. समीर चौधरी, डॉ.मिलिंद चौधरी, डॉ. रोहन पाटील, डॉ. स्नेहा वाडे, डॉ. विपीन खडसे, डॉ. प्रज्ञा सोनवणे, डॉ. सिकंदर खान, डॉ. पदमनाभ देशपांडे यांच्यासह सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य -गृहमंत्री

Next Post

सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजवाणी करा -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d