Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास होणार कारवाई

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास होणार कारवाई

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- आगामी सणासुदीचा व गर्दीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांकडून मोठया प्रमाणात खाजगी कंत्राटी बसेसचा वापर करण्यात येतो. प्रवाशांकडून खाजगी कंत्राटी वाहतूकीची ने-आण करणाऱ्या वाहतूकदारांकडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. अशा खाजगी कंत्राटी वाहनांच्या भाडेदरासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मंबई येथे जनहित याचिका क्र. 149/2011 दाखल करण्यात आली होती.

सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने खाजगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचे आदेश शासनास दिले होते. राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरुपाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडेदराच्या 50% पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांचे शासन निर्णय क्र. एमव्हीआर-0412/प्र.क्र.378/(पु.बा.07) परि.2 दि. 27 एप्रिल, 2018 अन्वये निश्चित करण्यात आले आहे.

राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, यांचे दिनांक 25 ऑक्टोबर, 2021 च्या ठराव क्र.02/2021 नुसार एस.टी.महामंडळाच्या प्रवासी बसेसकरीता असलेल्या भाडेदरामध्ये 17.17% वाढ करण्यात आलेली आहे. जळगाव शहरातून खाजगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. या कार्यालयाव्दारे खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवशांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करुन प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात फलक लावणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाश्यांचा माहितीकरिता या तक्त्यात नमुद असलेल्या भाडेदरास एकुण आसनक्षमतेने भागीतले असता प्रती आसन, प्रती प्रवाशी असा भाडेदर निश्चीत करता येईल.

तरी कोणत्याही खाजगी वाहतूकदाराकडून (खाजगी ट्रॅव्हल्स) कंपनीकडून महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांचे शासन निर्णय क्र. एमव्हीआर -0412/प्र.क्र.378/ (पु.बां.07)/परि.2 दि. 27 एप्रिल, 2018 अन्वये निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्याबाबत तक्रार mh१९@mahatranscom.in व dycommr.enf२@gmail.com या संकेतस्थळावर करावी. तसेच अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित वाहतूकदारावर मोटार वाहन कायदा 1988 अन्वये कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधित नागरिक व खाजगी ट्रॅव्हल्स वाहतूकदार यांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मायानगरीत जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याचे नाव कोरणारा अवलिया; थोडक्यात जाणून घ्या त्या अवलियाची कहाणी

Next Post

सरस्वती पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपालांकडून ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे सन्मानित

Next Post
सरस्वती पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपालांकडून ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे सन्मानित

सरस्वती पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपालांकडून ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d