Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पंतप्रधान मोदीजींच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देण्यासाठी चाळीसगांव येथे भव्य नमो दिवाळी बाजाराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
पंतप्रधान मोदीजींच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देण्यासाठी चाळीसगांव येथे भव्य नमो दिवाळी बाजाराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

चाळीसगाव(प्रतिनिधी)- कोरोना सारख्या भयानक काळात आपण अनेक मोत्यासारखी माणसे गमावली, जेव्हडी मनुष्यहानी झाली त्यापेक्षा अधिक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना जो आर्थिक फटका बसला त्यातून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सावरायला अनेक वर्षे जावी लागतील. या सर्वांना आधार देण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी मोफत जागा व सुविधा उपलब्ध करून दिवाळी बाजार भरवण्याचा प्रयोग केला आहे तो कौतुकास्पद असा आहे. समुद्र हा सतत घेत राहतो म्हणून त्याच्याकडून कुणी अपेक्षा ठेवत नाही मात्र ढग हे सतत देत राहतात म्हणून आपण सर्व त्याची वाट बघतो. आमदार मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून चाळीसगांव तालुक्यातील अनेक घटकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

आमदार देतात म्हणून लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा असते, मात्र हे सर्व पुण्यकर्म करत असताना सत्ता, संपत्ती अविचल असतात मात्र त्याचा वापर जनकल्याणासाठी जो करतो तो खरा माणूस असतो, ज्याच्यात दुसऱ्यांना निस्वार्थपणे देण्याची वृत्ती असते परमेश्वर त्याला कधी कमी पडू देत नाही. माझ्यासह सर्व जेष्ठ श्रेष्ठांचा आशिर्वाद तुमच्यासोबत आहे असे प्रतिपादन १००८ महामंडलेश्वर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली, सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी यांनी केले.

ते चाळीसगांव येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण व भाजपा चाळीसगांव आयोजित नमो दिवाळी बाजार उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. चाळीसगांव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित नमो दिवाळी बाजाराचे उदघाटन १००८ महामंडलेश्वर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली, सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी व माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील यांच्याहस्ते व भारतीय जनता पक्षाचे चाळीसगांव तालुक्यातील जेष्ठ नेते, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील यांनी आपल्या मनोगतात भारतीय अर्थव्यवस्था व बाजारपेठ या विषयावर विचार व्यक्त करत मार्गदर्शन केले, इतर देशांच्या मानाने भारताला कमी फटका बसला असला तरी देखील आपल्या गरजा मात्र कमी झाल्या नाहीत, आपल्या देशाचा १५ टक्के हिस्सा म्हणजे १२ लाख कोटींपेक्षा जास्त पैसा हा क्रूड ओईल साठी परदेशी जातो. दुसऱ्या स्थान सोन्याचे असून जवळजवळ ६ ते ७ लाख कोटींचे सोने आपण विदेशातून आयात करतो. ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी जास्तीत जास्त गरजा या आपल्या देशातच भागाव्यात यासाठी कोरोना संकटानंतर देशाची आर्थिक घडी बसविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाला सुरुवात केली, त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक बाजारपेठेला सुसूत्रता आणत नमो दिवाळी बाजार ही संकल्पना आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरु केली ती स्वागतार्ह्य असल्याचे देखील एम.के.अण्णा पाटील यांनी सांगितले.

माजी आमदार साहेबरावजी घोडे सर यांनी मंगेशदादा यांच्यासोबतच्या आठवणीना उजाळा दिला, मंगेश दादांच्या मामाचे घर माझ्या शेजारीच असल्याने मी त्यांना लहानपणापासून बघत आहे, मला कुणी विचारले की जिद्द, कष्ट व चिकाटी म्हणजे काय तर मी त्यांना सांगतो की मंगेदादांकडे पहा, कारण अथक कष्ट, प्रवास, धावपळ करून त्यांनी आपले विश्व उभे केले आहे. “जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख… सुलतान भी बन जाये तो दिल मै फकीर जिंदा रख, होसलो की तर्कश मे कोशिश का तीर जिंदा रख, हार जाओ गर जमाने मै सबकूच मगर फिरसे जितने की उम्मीद जिंदा रख” असा शेर सांगत त्यांच्या नमो दिवाळी बाजार या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, महिला आयोगाच्या माजी सदस्या सौ.देवयानीताई ठाकरे, जेष्ठ नेते अविनाश सूर्यवंशी, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील यांनी मनोगताच्या माध्यमातून दिवाळी बाजार या संकल्पनेचे स्वागत केले.आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोगत सांगितले की, गेली २ वर्ष कोविड महामारी, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी अडचणीत आला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारत संकल्पना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी व “देऊ व्यवसायिकांना आसरा, तोचि असे दिवाळी दसरा” हे ब्रीदवाक्य घेऊन तसेच खरेदी स्थानिकांकडून, आपल्या माणसांकडून या उद्देशाने हा नमो दिवाळी बाजार भरवला असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

समाज विकासासाठी शिक्षण, घर, आरोग्य, रोजगार बाबत हातभार लावून सहकार्य करूया -प्रमोद पाटील

Next Post

बंदी घातलेल्या फटाक्यांची विक्री करणे अवैध

Next Post
बंदी घातलेल्या फटाक्यांची विक्री करणे अवैध

बंदी घातलेल्या फटाक्यांची विक्री करणे अवैध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d