Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता -डॉ. भालचंद्र नेमाडे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/09/2021
in विशेष
Reading Time: 2 mins read
पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता -डॉ. भालचंद्र नेमाडे

गांधीतीर्थ येथे महात्मा गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दी औचित्याने विशेष कार्यक्रम

जळगांव(प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या ‘प्रेयस आणि श्रेयस’ या तत्त्वानुसार प्रगती साध्य करायला हवी. प्रगती म्हणजे वेग नव्हे तर प्रगतीची सुयोग्य दिशा मोलाची असते. यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले तरी ते घेतले पाहिजे व संस्कृती आणि पर्यावरण जोपासण्याच्यादृष्टीने प्रत्येकाने कृती करायला हवी, पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता आहे असे आवाहन डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले. डॉ. नेमाडे यांनी अनेक उदाहरणे व दाखले दिले. महात्मा गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दीच्या औचित्याने आपण घालत असलेले कपडे पर्यावरणपूरक, ज्या परिस्थितीत राहतो त्या हवामानाला अनुकूल आहेत का याबाबत आत्मचिंतन करणे आवश्यक आहे असे सांगून त्यांनी उपस्थितांना वस्त्राबाबत प्रतिज्ञा दिली. ‘गांधीतीर्थजळगावयेथेआज22 सप्टेंबर2021 रोजीपूज्यगांधीजींच्यावस्त्रत्यागशताब्दीच्याशुभप्रसंगीमीअसासंकल्पकरतोकी, पर्यावरणपोषककपडेवापरीनआणिसाधीराहणीहेपूज्यगांधीजींचेजगन्मान्यतत्त्वयथाशक्यआचरणातआणेल.’

आजच्या परिस्थितीत गांधी विचार क्षीण होत चाललेला आहे असे म्हटले जाते. गांधी विचार आचरणात आणायचा असेल तर घर्षण महत्त्वाचे असते, यातूनच मानवीमूल्य जोपासले जाऊ शकतात. एकूण मानवतेच्या विश्वात गौतम बुद्धानंतर, भगवान महावीर यांच्यासह मानवी जीवनांच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारे, जीवनमूल्य जोपासणारे, दीन-दुबळ्यांपर्यंत पोहोचलेले गांधीजी होते.

औद्योगिक क्रांतीच्या आधी जेवढे लागेल तितकेच उत्पादन होत असे परंतु नंतरच्या काळात गरजेपेक्षा जास्तीचे उत्पादन करण्यात आले त्यासाठी बाजारपेठा शोधणे सुरू झाले आणि त्यातूनच हिंसेचा उदय झाला. यातून माणसाचे महत्त्व कमी होऊन यंत्रांचे महत्त्व वाढले. स्वस्तात वस्तू बनवायच्या आणि ग्राहकांना जास्तीच्या किंमतीने विकायचे असे नफ्याचे अर्थशास्त्र सुरू झाले.

‘जोपर्यंत श्रीमंतगरीबांना आवश्यक एवढे स्वदेशी वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी केवळ पंचा नेसेल…’ या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मदुराई येथे घेतलेल्या प्रतिज्ञेला २२ सप्टेंबर २०२१ रोजी शंभर वर्ष झाली. महात्मा गांधी यांच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्त गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा ‘आज गांधी आठवतांना…!’ या विषयावर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या कस्तुरबा हॉलमध्ये निमंत्रितांसमोर हा कार्यक्रम आयोजण्यात आला होता. त्याचे गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सोशल मीडियावर त्याच्या ऑनलाईन प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या व्याख्यानानंतर श्रोत्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घेतले. यात गांधी विचार पुन्हा रुजविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? तसेच मराठी साहित्यात गांधी विचार फारसा दिसत नाही या प्रातिनिधीक प्रश्नांवर भाष्य केले.

आरंभी कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अनुभूती स्कूलचे शिक्षक निखिल क्षीरसागर आणि भूषण गुरव यांनी साने गुरुजींचे ‘खरा तो एकची धर्म…’ ही प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे वक्ते डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमाच्या औचित्याने शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधीजींनी केलेल्या वस्त्रत्याग घटनेच्या संकल्पनेबाबत छोटा माहितीपट बनविण्यात आला होता तो यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी चंद्रशेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंपनीचे सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. आभारप्रदर्शन गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी सुधीर पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

हा संपुर्ण कार्यक्रम गांधीतीर्थ या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या या अधिकृत https://www.youtube.com/watch?v=QU6UxkgEh60&list=LLO01_egeiXb0Re9jI7ZoLMw लिंकवर जावून पाहू शकता.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यातील कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासाठी नियोजन करण्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

Next Post

मंत्री छगन भुजबळ यांचा शुक्रवार जिल्हा दौरा

Next Post
मंत्री छगन भुजबळ यांचा शुक्रवार जिल्हा दौरा

मंत्री छगन भुजबळ यांचा शुक्रवार जिल्हा दौरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d