Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा येथील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया नियमानुसारच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
पाचोरा येथील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया नियमानुसारच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- पाचोरा नगरपरिषदेने जळगाव येथील फुले मार्केटच्या धर्तीवर तीन मजली नवीन कै. के. एम. (बापु) पाटील व्यापारी संकुल उभारले आहे मात्र यातील अटी शर्ती बाबत आक्षेप घेत चंद्रकांत मुरलीधर येवले व पितांबर गोविंदा पाटील यांच्यासह इतर काहींनी जिल्हा अधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार अपील दाखल केले होते.दरम्यान दोन्हीं बाजूंचे युक्तिवाद ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदाराचे अपिल फेटाळून लावत पाचोरा नगर पालिकेने राबवलेली लिलाव प्रक्रिया नियमानुसारच असल्याचा निकाल दिला आहे. दरम्यान या निकालामुळे व्यापारी बांधवांना आता पैसे भरण्यासाठी अल्प मुदत मिळाली असून त्यांनी बोली रक्कम वेळेत न भरल्यास अनामत रक्कम जप्त करून सदर गळ्यांचा पुनर्रलिलाव करण्याचा इशारा मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी दिला आहे.

पाचोरा येथे उभारलेल्या कै. के. एम. (बापु) पाटील व्यापारी संकुलात तळमजल्यावर फळे व भाजीपाला विक्रेत्यांसाठी १४२ ओटे, पहिल्या मजल्यावर ५८ तर दुसऱ्या मजल्यावर १०१ गाळे काढून त्याची रितसर विविध वृत्तपत्रात जाहिरात देऊन ऑन कॅमेरा व प्रांताधिकारी व मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया पार पाडली होती.व्यापारी बांधवानी देखील या लिलाव प्रक्रियेस उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. दरम्यान या गाळे धारकांना घालून दिलेल्या अटी व शर्तींमध्ये मोठ्या स्वरूपाची तफावत असल्याची आवई उठवत काहींनी गैरसमज पसरवले होते.दरम्यान गाळे धारकांची फसवणूक झाल्याची तक्रार येथील या अपिलावर नोटीस काढून जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदार व नगरपरिषदेस दि. १ जून २०२१ व दि. १५ जून २०२१ रोजी युक्तिवाद करून त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती.

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दोघ बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तक्रारदाराचे अर्ज नामंजूर करून नगरपरिषदेच्या बाजूने निकाल दिला असल्याने आता गाळे धारकांना आपला व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली आहे.तसेच नगरपालिकेने तातडीने गाळे धारकांनी उर्वरित रक्कम निर्धारीत अल्प मुदतीमध्ये भरण्याचे आवाहन केले आहे अन्यथा गळ्यांचा पुर्नलिलाव केला जाणार असल्याचे म्हटले आहे

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाचोऱ्यात शिवसेनेच्या महालसीकरणाला जनतेचा प्रतिसाद; ६५१९ नागरिकांना लाभ

Next Post

भडगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; सुदाम परदेशी बनले ठाण्याचे उपजिल्हाधिकारी

Next Post
भडगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; सुदाम परदेशी बनले ठाण्याचे उपजिल्हाधिकारी

भडगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; सुदाम परदेशी बनले ठाण्याचे उपजिल्हाधिकारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d