जळगाव -(प्रतिनिधी )-केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला.
इयत्ता पहिलीचे विद्यार्थी नटून थटून या कार्यक्रमासाठी हजर झाले.मुलींनी आपल्या वर्गबंधुना ओवाळून औक्षण केले व सुंदर अशा राख्या बांधल्या तर वर्ग बंधूंनी आपल्या बहिणींना सुंदर अशा भेटवस्तू दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव , गायत्री पवार यांनी केले. प्रसंगी मुख्याध्यापिका धनश्री फालक तसेच सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.










