Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाधित रुग्णांच्या मृत्युपैकी 84 टक्के मृत्यु पन्नासपेक्षा जास्त वयोगटातील नागरीकांनी कोरोना सदृश्य लक्षणे जाणवताच तपासणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दि. 8 – जिल्ह्यातील ज्या नागरीकांना कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असतील त्यांनी त्वरीत कोरोनाची तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांचेवर आवश्यक ते उपचार करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
           
जिल्ह्यात आतापर्यंत (7 ऑगस्ट) 13 हजार 574 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्वरीत तपासणी, त्वरीत निदान आणि त्वरीत उपचारामुळे यापैकी 9 हजार 344 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.83 % इतके आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत 592 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात मृत्युचे प्रमाण 4.36% टक्के आहे. मात्र, एकूण मृत्युपैकी 84 टक्के म्हणजेच 499 रुग्ण हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील होते असे निदर्शनास आले आहे. शिवाय एकूण मृत्युपैकी आजारपण असलेले 304 मृत्यु असून याचे प्रमाण 51.35 टक्के इतके आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक वयोगटातील ज्या नागरीकांना कोरोना सदृष्य लक्षणे आढळून येत असेल त्यांनी त्वरीत कोरोनाची तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांचेवर आवश्यक ते उपचार तातडीने करुन हे रुग्ण बरे होण्यास मदत होईल. असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात उपचार सुरु असलेले 3628 रुग्ण


           
जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या  13 हजार 574 कोरोना बाधित रुग्णांपैकी सध्या फक्त 3638 रुग्ण उपचार घेत आहेत. पैकी 246 रुग्ण गृह अलगीकरणात, 2484 रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये, 333 रुग्ण डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर 575 रुग्ण हे डेडिकेटेट कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या 2730 इतकी तर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 908 इतकी आहे. शिवाय जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात सध्या 356 रुग्ण आहेत.

जिल्ह्यात 61 हजार 739 व्यक्तींची कोरोना तपासणी
           


जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोत्तपरी उपाययोजना राबवित आहेत. यासाठी प्रशासनाने कोरोना सदृश्य लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची स्वॅब घेण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 61739 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून पैकी 49059 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 13 हजार 574 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. शिवाय तपासणीसाठी ॲटिजेंन किटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. या तपासणीद्वारे अवघ्या दोन तासात अहवाल प्राप्त होत असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 15217 व्यक्तींची याद्वारे तपासणी करण्यात आली असून पैकी 12425 अहवाल निगेटिव्ह तर 2792 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ


           
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या उपचाराच्या विविध सोईसुविधांमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण  बरे होण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील 13574 बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 9344 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.83 टक्क्यांवर पोहोचले आहे.

जिल्ह्यात 922 बेड उपलब्ध


           
जिल्ह्यात आढळून येत असलेल्या बाधित रुग्णांवर योग्य ते उपचार व्हावेत, त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात. याकरीता प्रशासनाने जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल सुरु केलेले आहेत. याशिवाय खाजगी रुग्णालयांना उपचाराची परवानगी दिली असून अनेक संस्थांना संस्थात्मक विलगीकरण सेंटर सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचाराची कोणतीही अडचण नाही. सद्य:परिस्थितीमध्ये जिल्ह्यात 922 बेड उपलब्ध असून यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 154, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटरमध्ये 475 तर डेडिकेटेट कोविड हॉस्पिटलमध्ये 293 बेड उपलब्ध आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांना कोराना घाबरु नये. परंतु जागरुक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत आपल्या नजीकच्या रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी. असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

रविंद्र पाटील यांचा “उत्कृष्ट वाहन चालक” म्हणुन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ३१३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ३१३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d