Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना-सागर रामभाऊ तायडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2020
in राष्ट्रीय, लेख, विशेष
Reading Time: 1 min read
बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना-सागर रामभाऊ तायडे

संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटात आहे,त्यामुळे सर्व उत्साहावर पाणी फिरले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकार यांची 129 वी जयंती जगभर उत्साहाने घरा घरात साजरी झाली.त्यांची गिनीज बुकवाल्यांना नोंद घ्यावी लागेल. कारण नेहमीच निळे वादळ ठरणारी भिम जयंती प्रथमच शांततेने साजरी झाली. दरवर्षी भिम जयंतीनिमित्त जाती व्यवस्था खेडया पाडयातच नव्हे तर शहरी भागात डोके वर काढण्याचा प्रयत्न करते.यावर्षी कोरोनामुळे काहीच घडले नाही.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटालुन हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिर पणे धम्म दीक्षा घेतली होती.ती घेतांना आपल्या नऊ कोटी समाज बांधवांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या.त्या पूर्ण पणे न स्विकारल्या मुले तथागत बुद्धाचे विचार आज आचरणात आण्यात समाज खुप कमी पडतो.म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकार यांची १२९ वी जयंती असो या बुद्धाची (२०६५ वी ) जयंती असो आम्हाला समाजात कोणताही बदल झाला असे म्हणता येत नाही किंवा बदल झाला नाही असे ही म्हणता येत नाही. उत्सव महत्वाचा वाटतो.विचार आणि त्यानुसार आचरण नाही.

भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.तोच खरा धम्मोधर असतो.धम्म उपासक उपासिका बनण्या करीता स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.त्यामुले आपली सामाजिक आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल असा सोप्या भाषेत सांगणारे बुद्ध आम्हाला आजही समजले नाही.बुद्ध पोर्णिमा जगातील मानवाच्या दुष्टीने खूप महत्वपूर्ण सण,उत्सव आहे. तो वेगवेगळ्या देशात वेग वेगळ्या नांवाने ओळखला जातो.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवसी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला.याच दिवशी सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते.आणि याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे  महापारीनिर्वान झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते,अंत दिप भव,स्वयं प्रकाशीत व्हा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शासन करती जमात व्हा या दोन महान संदेशाचा आम्ही अर्थच समजुन घेतला नाही.कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही.प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका असे बुद्ध नेहमी सांगत होते. विचारा वर विस्वास ठेउन प्रमाणिक पणे वागलात तर तुम्हाला आयुष्य हसवेल, तेव्हा समजा की हे चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.याची आठवन आपल्याला अन्याय अत्याचार व हत्याकांड झाल्यावरच येते.बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत आठवत नाही.ते म्हणतात संघ बडा बलवान संघ करेगा सबकी रक्षा क्यो की संघ बडा बलवान.

धर्मांतरीत आंबेडकारी समाज, संघ,संघटना आणि पक्ष विचारधाराच मानत नाही. हे मान्य करीत नाही.म्हणुन इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.हे रिपब्लिकन आणि आंबेडकरी समाजाला कोण सांगेल?. आंबेडकर आणि बुद्ध जयंती साजरी केलीच पाहिजे पण विचारधारे नुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्व प्राप्त होते.युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आर एस एस च्या प्रत्येक घटना कडे लक्ष ठेउन स्वताचा कार्यकर्म ठरवायचा. म्हणजे तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील.तुम्हाला समता,स्वत्रंत, बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागेल. त्या नुसार समाजात चर्चा बैठका घेउन सातत्य ठेवावे लागेल.केवळ जयंती साजरी करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर जयंती साजरी करण्याचा अर्थ काय?.

माणसाच्या संघाने संघटने पक्षाने जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नये,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.हे आजच्या आंबेडकरी चळवळी कोण सांगेल?. बुद्ध म्हणतात काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता.त्यात सर्वोचस्थानी आपन पोचु शकतो. स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंतन सतत केले पाहिजे.संघर्ष केल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.म्हणुनच बुद्ध विहारे ही समाजाची समाज परिवर्तनाची केंद असायला पाहिजे होती.पण बहुसंख्य विहारे व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदा मुळे बंद असतात.

श्रीलंका,थायलंड,बर्मासह १८० देशात बुद्ध विहारे ही  शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे केंद्र असतात.तिथे शिस्तबद्ध आचरणात सर्व व्यवहार होतात.  एक दिवस विशेष बुद्ध जयंती साजरी करून त्यांना काहीच बदल अपेक्षित नसतो. समाजातील चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवु शकत नाही.जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे, मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.म्हणजे समाजात बदल घडेल. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.अडीच हजार वर्षा पूर्वी बुद्धानी मानव कल्याणा साठी सांगितलेला संदेश आज ही एकूण मानव जाती साठी खुप उपयोगी आहे.व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा होईल.जर समाजातील व्यक्तीचा विकास झाला नाही तर समाज काय करेल व्यक्ति एकत्र आल्या तर समाज तयार होतो.समाज एकत्र आला तर संघ,संघटना आणि पक्ष तयार होतो.मग तो मानव कल्याणा करीता मानव मुक्तीचा मार्ग खुला करतो.आज देशात भिख्खु संघ संघटित नाही.त्यामुले देशातील उपासक उपासिका यांचा ही संघ संघटना संघटित नाही.डॉ बाबासाहेबांनी दिलेला धम्म किती ही चांगला असला तरी तो आत्मसात करण्यात आपन कुठे तरी कमी पडतो.म्हणुन तमाम आंबेडकरी चळवळी बौद्ध बांधवास बुद्ध जयंती निमित्याने स्वताचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून बुद्धाला त्यांच्या धम्माला शरण जा आणि संघ शक्ति बनवा. बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना.हिच बुद्ध जयंती निमित्य सर्वाना नम्र विनंती, आणि हार्दिक मंगल कामना!!!.सबका मंगल हो !!!

सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप,मुंबई

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

दिलासादायक! अखेर मुंबईत उद्यापासून वाईनशॉप बंद.

Next Post
दिलासादायक! अखेर मुंबईत उद्यापासून वाईनशॉप बंद.

दिलासादायक! अखेर मुंबईत उद्यापासून वाईनशॉप बंद.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d