Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बॉक्सिंग प्रशिक्षकासह खेळाडूंनी 7 ऑक्टोबपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
बॉक्सिंग प्रशिक्षकासह खेळाडूंनी 7 ऑक्टोबपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जिल्हास्तरीय खेलो इंडिया केंद्र, जळगाव अंतर्गत बॉक्सिंग खेळाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक व खेळाडूंची निवड करण्याकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.

देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत म्हणून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया सेंटरअंतर्गत जिल्ह्यात क्रीडा केंद्र मंजूर केले आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात बॉक्सिंग या खेळाकरीता श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. बॉक्सिंग या खेळाच्या प्रशिक्षण केंद्राकरीता माजी सर्वोत्कृष्ट खेळाडू, अतिउच्च कामगीरी/गुणवत्ता प्रमाणपत्र/अनुभव असलेला 1 क्रीडा प्रशिक्षकाची नियुक्ती बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण देण्याकरीता करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षकाचे वय 18 ते 45 वर्षे वयोगटातील असावे.

त्याचबरोबर 30 खेळाडू प्रशिक्षणार्थीची निवड त्यांनी संपादन केलेल्या बॉक्सिंग या खेळाच्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीनुसार करण्यात येणार आहे. खेळाडूचे वय 20 वर्षांआतील असावे. खेळाडूची जन्मतारीख 1 जानेवारी, 2002 नंतरची असावी. इच्छुक पात्रताधारक क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंनी आपले अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांच्या नावाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कामकाजाच्या वेळेत 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत सादर करावेत. अर्जासमवेत आधारकार्ड व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रती जोडाव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू

Next Post

तरुणांनी व्यसन नाही तर वाचन करावे; स्व.बापुजी युवा फाऊंडेशनने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवकांना दिला संदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d