
मुंबई, (प्रतिनिधी)- राज्यात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून नवीन आदेश आज जारी करण्यात आले असून २२ एप्रिल उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत.

लोकल ट्रेन प्रवास सामान्यांसाठी असणार बंद

लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना असणार आहे तर सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील. शासकीय कार्यालयात देखील यापुढे फक्त पंधरा टक्के उपस्थितिती राहणार आहे.

ब्रेक दि चेन चे निर्बंध झाले अधिक कडक.

* शासकीय कार्यालयात राहणार फक्त 15% कर्मचारी उपस्थित.

* लग्न समारंभ 25 व्यक्तींच्या उपस्थितीत उरकवा लागणार अवघ्या दोन तासांत. अन्यथा होणार 50 हजाराचा दंड

* खाजगी वाहनातून प्रवासासही राहणार निर्बंध. नियमांचे उल्लंघन झाल्यास होणार 10 हजाराचा दंड










