Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव ; जळगांव ते वाडे मुक्कामी बस सेवा सुरु करा.

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगाव ; जळगांव ते वाडे मुक्कामी बस सेवा सुरु करा.

भडगाव पोलीस निरीक्षकांना पञकार अशोक परदेशी यांचे निवेदन. अन्यथा दि. ७/६/२०२२ पासुन आमरण उपोषणाचा इशारा. भडगाव वार्ताहर — भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी या बंद बस फेर्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात.याबाबत वेळोवेळी मागण्या मांडल्या. या मागणीचे निवेदनही यापुर्वी दिलेले आहे. माञ याकडे पाचोरा, भडगाव आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे. तरी भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी बस हया बंद फेर्या तात्काळ पुर्ववत सुरु करण्याबाबत आगार प्रमुख पाचोरा, बसस्थानक प्रमुख ,जळगाव वाहतुक नियंञक, पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील, भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पाचोरा आगार प्रमुख, भडगाव बसस्थानक वाहतुक नियंञक आदिंना भडगावचे पञकार अशोक महादु परदेशी यांनी दि. ३०/५/२०२२ रोजी निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत. पाचोरा आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आपल्या एस टी कर्मचार्यांच्या संपामुळे सर्वञ बस फेर्या बंदच होत्या. माञ कर्मचार्यांचा संप मिटुनही भडगाव ते वाडे मार्गाच्या बस फेर्या पुर्ववत सुरु करण्यात आलेल्या नाहीत. भडगाव बसस्थानकामार्गाने लांब पल्याच्या अनेक बस फेर्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. भडगाव तालूक्यातही काही गावांना बसफेर्या सुरु झालेल्या आहेत. विदयार्थ्यांच्या शाळा, परीक्षाकाळातही भडगाव ते वाडे बंद बस फेर्या पुर्ववत सुरु करण्याची अनेकदा मागणी करण्यात आली.

तसेच दि. १०/५/२०२२ रोजी भडगाव बसस्थानक प्रमुख, पाचोरा आगारप्रमुखांकडे भडगाव ते वाडे बस फेर्या पुर्ववत सुरु करण्याबाबत निवेदन दिले होते. बस फेर्या सुरु करण्याबाबत आपणाकडुनही आश्वासनही देण्यात आले होते. माञ अदयापही भडगाव ते वाडे बस फेर्या पुर्ववत सुरु करण्यात आलेल्या नाहीत. एस टी महामंडळाकडुन बस फेर्या सुरु करण्याबाबत सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशी, विदयार्थी, नागरीकातुन नाराजी व्यक्त होत आहे. असेही निवेदनात नमुद केलेले आहे. विदयार्थी, प्रवाशांना पायी प्रवास करुन ञास सहन करावा लागला. खाजगी वाहनांनी प्रवास करुन प्रवाशांना आर्थीक भुर्दड सहन करावा लागला. भडगाव ते वाडे बस फेर्या सुरु झाल्या असत्या तर एस टी महामंडळाचेही उत्पन्नात वाढ झाली असती. गाव तेथे बस सेवा हे सार्थ ठरले असते. बस सेवेअभावी प्रवाशांना वंचित राहावे लागले आहे. भडगावी तालुक्याच्या शासकीय , खाजगीकामी , बाजारपेठेत येणे नागरीकांना ये जा करणे मोठया ञासाचे ठरत आहे. शेतकरी, संजय गांधी आदि शासकीय योजनेचे अनुदान, पगार घेण्यासाठी भडगावी ये जा साठी वृद्ध गोरगरुबांना खाजगी वाहनांनी प्रवास करुन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोना काळातही बस सेवा बंदच होत्या. आताही मोठा ञास सहन करावा लागत आहे. एस टी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बस फेर्या पाचोरा आगारातुन सुरु केलेल्या आहेत. मग जळगाव ते वाडे बंद बस फेर्या सुरु केल्या असत्या तर प्रवाशांची प्रवासाची सोय झाली असती. एस टी महामंडळाचे उत्पन्नही वाढले असते. तरी एस टी महामंडळाने तात्काळ भडगाव ते वाडे बस फेर्या व जळगाव ते वाडे मुक्कामी बस फेरी सुरु केल्यास टेकवाडे बुद्रुक, वाडे, बांबरुड प्र ब, नावरे, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, लोणपिराचे , बोरनार, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, नवे वढधे, जुने वढधे, भडगाव या भागातील जवळपास १८ गावातील प्रवाशी, विदयार्थ्यांची प्रवासासाठी सोय होणार आहे. जळगाव ते वाडे मुक्कामी बस फेरी सुरु केल्यास वाडेसह, भडगाव, जळगाव पर्यंत अनेक गावांची प्रवाशांची प्रवासासाठी सोय होणार आहे. तरी पाचोरा आगार प्रमुखांनी, एस टी महामंडळाने भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी बस फेरी बंद झालेली फेरी पुर्ववत सुरु करावी. सर्व बसफेर्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात. प्रवाशांना बस सेवेचा लाभ दयावा. अन्यथा नागरीकांच्या न्याय व हक्कासाठी दि. ७/६/२०२२ वार मंगळवार पासुन भडगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रवाशी, नागरीकांसह बसण्याचा मार्ग अवलंबविण्यात येईल. व त्यास होणार्या परीणामाची आपली सर्वस्वी जबाबदारी राहील. असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भडगाव पञकार अशोक परदेशी यांची सही आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी बस सेवा सुरु करा;भडगाव पोलीस निरीक्षकांना पञकार अशोक परदेशी यांचे निवेदन

Next Post

भडगांव ; वाडे येथे कायमस्वरुपी तलाठी नेमणुकीची मागणी

Next Post

भडगांव ; वाडे येथे कायमस्वरुपी तलाठी नेमणुकीची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d