जळगांव- मोदी सरकार 2.0 – प्रथम वर्षपूर्ती अभियाना अंतर्गत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांच्या आवाहनानूसार व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या संकल्पनेतून जळगांव येथील भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी जळगांव शहरातील अनेक भागात 3500 कुटुंबांना भारत सरकार च्या आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुचविलेले होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम-30 या औषधाचे मोफत वाटप केले.

या वेळी अनेक हातगाडी विक्रेत्यांना तसेच रिक्षा चालकांना सदर औषधी सोबत सॅनिटायजर व मास्क चे सुध्दा वाटप करण्यात आले. या वेळी त्यांच्या सोबत भाजप अल्पसंख्याक मोर्चा महानगर पदाधिकारी मोहम्मद नूर शेख, गुड्डू पठाण,फिरोज खान,तौसिफ शेख,अख्तर सैय्यद,इम्रान पठाण उपस्थित होते.

सदर औषधी,सॅनिटायजर व मास्क चे वाटप हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनांचे व सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करून, घरोघरी जावून गरजूंना वाटप करण्यात आले.

सदर अल्पसंख्याक मोर्चाच्या या सामाजिक कार्यास खा. उन्मेश पाटील,जळगांव शहराचे आमदार राजुमामा भोळे,आ.चंदू पटेल,महापौर भारती सोनवणे,शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी शुभेच्छा व्यक्त करून मार्गदर्शन केले.










