Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मराठी भाषा भवनात अभिजात मराठी दालनासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची तज्ज्ञांसोबत चर्चा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
मराठी भाषा भवनात अभिजात मराठी दालनासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची तज्ज्ञांसोबत चर्चा

मुंबई(प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे उभारण्यात येत असलेल्या मराठी भाषा भवनमध्ये अभिजात मराठी भाषा दालनाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष श्रीधर दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके, मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी व मराठी भाषा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मराठी भाषा मंत्री श्री. देसाई म्हणाले की, मराठी भाषा भवनामध्ये अभिजात मराठीचा परिचय करून देणारे स्वतंत्र असे दालन तयार करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. या दालनातून देश-विदेशांतील लोकांना मराठी भाषेची महती व ऐश्वर्य कळेल, अशा स्वरुपाचे साहित्य या ठिकाणी ठेवले जाईल. अभिजात मराठीची महती सांगणारे सर्व साहित्य व पुरावे या दालनात ठेवले जाईल.

या निमित्ताने मराठी माणसांच्या मनामध्ये मराठीविषयी विश्वास निर्माण केला जाईल.यावेळी प्रा. डॉ. हरी नरके यांनी काही सूचना केल्या. २२५० वर्षांपूर्वी तमिळ संगम ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आलेला आहे. १२८५ मध्ये कन्नड विद्यापीठात मराठी भाषा शिकवली जात असल्याचे पुरावे आहेत. तामिळनाडूत काम करणारे कारागिर मराठी भाषेतून संवाद साधत असल्याचेही पुरावे आहेत, ही सर्व माहिती दालनात समाविष्ट करण्यात यावी. याशिवाय भंडारकर प्राच्यविद्या संस्थेकडे ८५ दुर्मिळ ग्रंथ असून त्याचाही या दालनात समावेश करण्याची सूचना करण्यात आली. मराठीच्या ५२ बोलीभाषा असून त्याचाही या दालनात समावेश करण्यात यावा.

इतर भाषांनी देखील मराठीसाठी खूप मोठे योगदान दिले आहे, त्याचा देखील या दालनात समावेश करावा अशा सूचना प्रा. नरके यांनी केल्या.डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, ११ वी १२ वीच्या अभ्यासक्रमात प्राकृत समावेश करण्याची गरज आहे. मराठी भाषेच्या विकासातील विविध टप्प्यांचा या दालनात समावेश करावा, यासोबत महानुभाव व्याख्यान पद्धतीचाही यात समावेश करण्यात यावा.श्री.श्रीधर दीक्षित म्हणाले की, मराठी भाषा विभागाच्या दालनात सर्व संतांच्या कार्यकालाचा कालसुसंगत समावेश असावा. राजभाषा, ज्ञानभाषा, लोकभाषा अशी क्रमाने मराठीची ओळख करून द्यावी. सर्व भाषाविषयक साहित्य एका दालनात उपलब्ध करून द्यावे. भाषाविषयक सर्व पुरावे, साहित्य या दालनात असावे. महाराष्ट्र विश्वरूप दर्शन या ठिकाणी घडावे. भाषेची सर्व रुपे, बोली, महानुभाव लिपीची तीन पातळीवर मांडणी व्हावी. मराठीसह इंग्रजी व हिंदी भाषेत सूचनांचा दालनात समावेश असावा.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आदिवासी बांधवांबरोबर बसून प्रश्न जाणून घेता आले -राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

Next Post

राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी

Next Post
राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी

राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d