Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मराठी वाचन संस्कृती प्रगल्भ : डी.डी. न्यूजचे उपसंचालक नितीन सप्रे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/10/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
मराठी वाचन संस्कृती प्रगल्भ : डी.डी. न्यूजचे उपसंचालक नितीन सप्रे

नवी दिल्ली(प्रतिनिधी)- साहित्य संमेलने, मोठ्या प्रमाणात प्रकाशित होणारे दिवाळी अंक,संगीत नाटके आदींची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली असून मराठी वाचन संस्कृती प्रगल्भ असल्याचे प्रतिपादन भारतीय माहिती सेवेचे अधिकारी तथा डी.डी. न्यूजचे उपसंचालक नितीन सप्रे यांनी आज केले.माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमात श्री. सप्रे बोलत होते.

ते म्हणाले, वाचनाने माणसाच्या ज्ञान कक्षा रुंदावतात आणि व्यक्तिमत्व प्रगल्भ होते. वाचनाने शब्द संपदा वाढते आणि अर्जित केलेले ज्ञान इतरांना दिल्याने ज्ञानाचा प्रसार होतो.महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची समृद्ध परंपरा आहे, देशातील ही सर्वात जुनी साहित्य परंपरा आहे. राज्यात दिवाळी अंक प्रकाशित होण्याची मोठी परंपरा आहे . या सर्व साहित्यिक चळवळींमुळे महाराष्ट्रात वाचनाची प्रगल्भ परंपरा निर्माण झाली आहे. संगीत नाटक व अन्य कलांचा समृद्ध वारसाही राज्यातील वाचन संस्कृतीला समृद्ध करण्यास महत्त्वाचा ठरल्याचे श्री. सप्रे म्हणाले.

मराठी भाषेतील उत्तम कलाकृतींचा अनुवाद होऊन देश-विदेशात मराठी साहित्य पोहोचावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.समर्थ रामदासांच्या कलाकृतींमधून उद्धृत होणारी वाचनाची महती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले अफाट वाचन यावरही श्री. सप्रे यांनी प्रकाश टाकला. माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुणे भेटीप्रसंगी आकाशवाणी पुणेचे प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमांच्या वार्तांकनावेळचे अनुभव कथनही श्री. सप्रे यांनी यावेळी केले.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे वाचन संस्कृतीचा होत असलेला प्रवास सुखावह असल्याचे सांगतानाच बदलत्या जीवनशैलीमुळे वाचन कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. परिचय केंद्राच्या तिन्ही भाषेतील ट्विटर हँडल, तिन्ही फेसबुकपेजवर या व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.वाचन प्रेरणा दिनानिमित्त परिचय केंद्राच्या वतीने समाज माध्यमांद्वारे दिल्लीतील मराठी विद्यार्थ्यांचे वाचन अनुभव व संदेशांचेही प्रसारण करण्यात आले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

Next Post

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Next Post
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून माजी सैनिक पाल्यांना अर्ज करण्याचे आवाहन

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d