Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘महानिर्मिती’ला हरित ऊर्जा निर्मितीकरिता प्रतिष्ठेचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ पुरस्कार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
‘महानिर्मिती’ला हरित ऊर्जा निर्मितीकरिता प्रतिष्ठेचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ पुरस्कार

मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत महानिर्मितीची प्रतिष्ठेच्या इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी संस्थेतर्फे सन 2021 करिता इंडिया ग्रीन एनर्जी पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अभिनंदन केले आहे.

पर्यावरणपूरक हरित ऊर्जा निर्मितीकरिता हा पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले व नियोजित सौर ऊर्जा प्रकल्पांकरिता हा पुरस्कार महानिर्मितीला देण्यात आला आहे.”पर्यावरण रक्षण आणि शेतकऱ्यांना दिवसाही ऊर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही हरित ऊर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.

या पुरस्काराने आमच्या प्रयत्नांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. यामुळे हा पुरस्कार या प्रयत्नांना नवे बळ देणारा आहे,” असे डॉ. राऊत म्हणाले.हा पुरस्कार दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. महानिर्मितीने मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आदर्श ग्राम राळेगणसिद्धी येथे 2 मेगावॅट तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये मांजरडा येथे 2 मेगावॅट आणि अमरावती जिल्हा येथील गव्हाणकुंड येथे 16 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करून त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज पुरवठा होण्यासाठी वरील प्रकल्पांची उभारणी केली आहे.

राज्याच्या वीजेच्या एकूण मागणीमध्ये शेतीकरिता विजेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. यामध्ये मागणी आणि पुरवठा पाहता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करण्यात येत असल्याने त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. तसेच वीजनिर्मिती केंद्रापासून शेतीकरिता वीज वापराचे ठिकाणापर्यंत वीज वहनामध्ये सरासरी 10% तूट होत असते. मात्र या योजने अंतर्गत छोटे सौर ऊर्जा प्रकल्प हे विजेच्या मागणीच्या ठिकाणाजवळ उभारण्यात येत असल्याने वीज वहनातील तूट कमी होण्यास मदत मिळणार आहे.

तसेच औष्णिक वीज निर्मिती ऐवजी सौर ऊर्जा प्रकल्पातून ही वीज निर्मिती केल्यास कोळश्यापासून होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.पर्यावरणपूरक हरित वीज निर्मितीचे महानिर्मितीद्वारे शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये खात्रीशीर दिवसा वीज पुरवठा करता यावा याकरिता महानिर्मितीतर्फे कोणताही फायदा न घेता वीज खरेदी करार करण्यात येत असून महानिर्मिती एकूण 583 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून यापैकी टप्पा 1 अंतर्गत राज्यातील विविध 46 ठिकाणी 184 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी सुरु असून ते मे 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच उर्वरित प्रकल्प टप्प्याटप्प्याने नजीकच्या काळात कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

Next Post

‘किशोर’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post
‘किशोर’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘किशोर’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d