Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे कर्ज माफीचे 63 दिवसीय आंदोलन खासदारांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे कर्ज माफीचे 63 दिवसीय आंदोलन खासदारांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित

जळगांव(प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रातील मायक्रो फायनान्स महिला बचत गटांचे मार्च 2020 पर्यंतचे संपूर्ण कर्ज केंद्र सरकारने माफ करावे , या मागणीसाठी दि पीपल्स फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती गायत्री विश्वनाथ सोनवणे व त्यांच्या समस्त सहकारी महिला यांच्या नेतृत्वाखाली बचत गट कर्ज धारक महिला 12 ऑक्टोबर 2021 पासुन 13 डिसेंबर 2021 पर्यंत सुमारे 63 दिवसांपासुन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर धरणे आंदोलनाला बसलेल्या होत्या.

विविध पक्ष, संघटना व समाजसेवक यांनी सदर आंदोलनास भेट दिली व पाठिंबा जाहीर केला. दरम्यानच्या काळात खासदार उन्मेष पाटिल, खासदार रक्षाताई खडसे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही आंदोलकांशी चर्चा केली व आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली होती. परंतु याविषयी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून लेखी आश्वासन मिळत नसल्याने आंदोलकांनी आजपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले.

मागील तीन – चार दिवसांपासून खासदार उन्मेष पाटिल यांनी आंदोलक महिलांशी फोनवर चर्चा करून, सदर मागणी अधिवेशनात मांडुन व केंद्र सरकारच्या माध्यमातुन किंवा संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याविषयी लेखी आश्वासन पत्र दिले . सदर पत्र आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी विलास हरणे यांच्या हस्ते आंदोलन स्थळी आंदोलांकर्त्या श्रीमती गायत्री विश्वनाथ सोनवणे व त्यांच्या समस्त महिला सहकारी यांना देण्यात आले. या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, कांग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष अमजद पठाण, जननायक फाऊंडेशनचे फिरोज पिंजारी , शिवसेना महानगर जिल्हा उपाध्यक्ष फरीद खान, लोकशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष पराग कोचुरे, धर्मरथ फाऊंडेशनचे विनायक पाटिल, मुस्लिम सेवा संघाचे महिला जिल्हाध्यक्ष फिरोजा शेख, विनोद अढाळके, छाया जाधव, आयेशा मणियार, चारुलता सोनवणे, दिपीका भामरे , धारा ठाकर आदि उपस्थित होते. सदर मागणीला योग्य न्याय न मिळाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन उभारण्यात येईल असे श्रीमती गायत्री विश्वनाथ सोनवणे व सहकारी महिला आंदोलांकर्त्या कळवले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

रेस्टोरंटसाठी कारागीर तसेच रिसेप्शन साठी मुले व मुली पाहिजे

Next Post

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समर्पण वृत्ती, शिक्षक, कर्मचार्‍यांचे प्रयत्नांनी संस्था प्रगतीपथावर!

Next Post
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समर्पण वृत्ती, शिक्षक, कर्मचार्‍यांचे प्रयत्नांनी संस्था प्रगतीपथावर!

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समर्पण वृत्ती, शिक्षक, कर्मचार्‍यांचे प्रयत्नांनी संस्था प्रगतीपथावर!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d