Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना १५ डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत तर १५ जानेवारी पासून सादरीकरणाला सुरुवात होणार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
23/11/2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

मुंबई(प्रतिनिधी)- शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने अनेक रंगकर्मी तसेच सहभागी संस्था व संघटना यांनी प्रवेशिका सादर करण्याची मुदत तसेच सादरीकरणासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती.

या विनंतीचा विचार करुन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी राज्य नाट्य व बालनाट्य स्पर्धेची प्रवेशिका सादर करण्याची मुदत 15 डिसेंबर पर्यंत तर नाट्य स्पर्धा सादरीकरण दिनांक 15 जानेवारी पासून सुरुवात होईल, अशी घोषणा आज केली.

राज्यातील जास्तीत जास्त संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री महोदयांनी केले आहे. तसेच कोविड विषयक नियमांचे पालन करून नाटकांची तालीम व प्रयोग सादरीकरण करावे असेही आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या घोषणेस अनुसरून संचालनालयामार्फत प्रसिद्ध पत्रक काढण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द जिल्हा उपनिबंधक यांची माहिती

Next Post

अमृतमहोत्सवाची बालसंजीवनी अभियान

Next Post
अमृतमहोत्सवाची बालसंजीवनी अभियान

अमृतमहोत्सवाची बालसंजीवनी अभियान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d