Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महा समृद्धी महिला सक्षमीकरणात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने महिलांना केले स्वावलंबी-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महा समृद्धी महिला सक्षमीकरणात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने महिलांना केले स्वावलंबी-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती


जळगांव(प्रतिनिधी)- महीलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात RSETI जळगांव यांच्या सहकार्याने विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढविण्यासाठी उत्पादन व सेवा क्षेत्रात उद्योग निर्मितीसाठी बँकेमार्फत सहा हजार गटांना बँक लिंकेजच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न तसेच २२ गटांचे प्रस्ताव जिल्ह्यास प्राप्त झाले आहे.  महिलांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यात दर्जेदार उत्पादने तयार करणाऱ्या महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या प्रतिनिधीचा सहभाग होता. त्यासोबत तालुकास्तरीय कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या व अभियान कालावधीत जिल्हास्तरीय “मुक्ताई ब्रँड” ची प्रसिद्धी करण्यात आली.

महिलांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी जिल्हाभरातील विविध शासकीय कार्यालयाना बचत गटांचे उत्पादने, सेवा घेण्यासंदर्भात आवाहन करुन आदेशीत करण्यात आले. जिल्ह्यातील युवक युवतीना DDUGKY अंतर्गत जिल्ह्यातील सद्यस्थितीत चालू असलेल्या संस्थेमार्फत व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना/कार्यक्रमाचा/अभियानाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAY-G अंतर्गत जिल्ह्यात ८ घरकुल आहे. चालू घरकुल मार्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४० महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत आहे. महिलांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अन्न, पोषण, आरोग्य व आरोग्य संदर्भात पोषण पंढरवाडा संपूर्ण जिल्ह्यात कोविडच्या नियमांचे पालन करुन साकार करण्यात आला. पोषण पंधरवाड्यात विविध उपक्रम पोषण परसबागांची निर्मिती, महिलांचे हिमोग्लोबिन व BMI तपासणीचे विविध कॅम्प घेण्यात आले.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विकासाच्या उपक्रमात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महिला सक्षमीकरणासाठी उद्योग व्यवसाय प्रशिक्षणासाठी तालुका निहाय ऑनलाईन स्वरूपात पॅकेजिंग ब्रॅण्डिंग व मार्केटिंग संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरावरमहिला स्वयंसहाय्यता समूहाची कार्यशाळा घेण्यात आली.

सदरील कार्यशाळेत शासनाच्या विविध योजना बचत गटानपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व पायाभूत माहितीमहिला बचत गटांच्या प्रतिनिधीना देण्यात आली. तालुका स्तरीय कार्यशाळा दिनांक १० मार्च २०२१ व काही तालुक्यांनी ११ मार्च २०२१ घेतल्या व जिल्ह्यातील ९४५ गावांमध्ये महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत विवीध शासकीय योजनांचा कृतीसंगम कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हा स्तरीय सर्व कार्यक्रम शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय अंमलबजावणी संनियंत्रण व मुल्यमापन समितीचा वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन अंमलबजावणी करण्यात येत आहे. महासमृद्धी महिला सक्षमीकरणाच्या व्यापक प्रसिद्धसाठी जिल्ह्यातील सर्व वृत्त पत्रांमध्ये बातम्या काही निवडक वृत्त पत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. 

जिल्ह्यातील ११५१ ग्रामपंचायतींना महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात पोस्टर चिटकवण्यात आले.तसेच विविध शासकीय कार्यालयात काॅफी कपाचे वितरण करण्यात आले जेणेकरून शासकीय कार्यालयात व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होईल. यासोबतच सर्व १५ पंचायत समित्यांना महासमृद्धी महिला सक्षमीकरणाचे पोस्टर दर्शनी भागात लावण्यात आले. सर्व व्यापक प्रसिद्धसाठी सर्व समावेशक घटकांचा सहभाग घेतला जात आहे.अशी माहिती प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सोनी नगरातील खुल्या जागेवर रुग्णालय बांधण्यासाठी उपमहापौरांचा हट्ट का?

Next Post

क्रीडा पुरस्कारांसाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
क्रीडा पुरस्कारांसाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

क्रीडा पुरस्कारांसाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d