Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मानसी बागडे आत्महत्याप्रकरणी दोषींवर सामाजिक बहिष्कार कायद्यानुसार कारवाई करावी;महाराष्ट्र अंनिसची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मानसी बागडे आत्महत्याप्रकरणी दोषींवर सामाजिक बहिष्कार कायद्यानुसार कारवाई करावी;महाराष्ट्र अंनिसची मागणी

जळगाव : येथील जाखनीनगर भागातील रहिवासी मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे या तरुणीच्या आत्महत्येस कारणीभूत जात पंचायत प्रमुख व सदस्यांना प्रचलित सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत अटक करावी आणि दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावे या बाबतचे निवेदन शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जळगावने पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

      शहरातील जाखनीनगर भागात कंजरभाट समाजातील मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी याकरिता पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची कार्यकर्त्यांनी भेट घेतली. तत्पूर्वी सकाळी मुंबईवरून प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीवरून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जळगाव एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र तेथे काहीही दाखल नव्हते. दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याने वेळेचे महत्व लक्षात घेत तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलाभ रोहन यांचेशी फोनवरून संपर्क साधत, घटनेची माहिती दिली. डॉ.रोहन यांनी तत्काळ यंत्रणेला सूचित करीत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाला पाठविले. त्यानुसार त्यात मानसीचा मृत्यू हा गळफास घेऊन झाल्याचे लक्षात आलेले आहे.

पोलीस अधीक्षकांची दुपारी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात, सदर तरुणीने कंजरभाट समाजातील जातपंचायतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा आम्हाला संशय आहे. सदर जमातीच्या जात पंचांची सखोल चौकशी करून मानसी उर्फ मुस्कानच्या आत्महत्येस कारणीभूत सर्व जात पंचांवर प्रचलित आपण सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा २०१६ नुसार कठोर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर घटनास्थळी कार्यकर्त्यांनी भेट दिली. परिस्थिती व घटनेचे प्राथमिक स्वरूप जाणून घेतले. यावेळी विश्वजीत चौधरी, अॅड. भरत गुजर, जिल्हा  कार्याध्यक्ष प्रा. डी..एस.कट्यारे अशफाक पिंजारी, जितेंद्र धनगर, अॅड.डी.एस.भालेराव, आर.एस.चौधरी उपस्थित होते.

घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी असून जातपंचायतीच्या जाचाविरोधात आगामी काळात जनजागृती करण्याचे नियोजन अंनिस करणार आहे. जातपंचायतीचा जाच, आंतरजातीय विवाहाविषयी कोणाला अडचणी येत असतील तर त्यांनी अंनिसकडे लेखी माहिती द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवून त्याची दखल घेतली जाईल अशी माहिती जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स.पो.नि. रविंद्र बागुल यांच्या बदलीसाठी सातगाव डोंगरी येथील ग्रामस्थांचे २५ रोजी आमरण उपोषण

Next Post

जातपंचायतीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी अजून काय होणे आवश्यक आहे?….. डॉ ठकसेन गोराणे.

Next Post

जातपंचायतीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी अजून काय होणे आवश्यक आहे?..... डॉ ठकसेन गोराणे.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d