Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता

मुंबई(प्रतिनिधी)- येत्या 22 ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

राज्यातील कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 11 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामध्ये चित्रपटगृहांनी पाळावयाची सर्व मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्यात आली आहेत. या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृहे बंद असतील.

चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तर चित्रपटगृहे मालकांना राज्य शासनाच्या महसूल आणि वने विभाग, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.याशिवाय चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमध्ये सिनेमा पाहणाऱ्या येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.

चित्रपटगृहांमध्ये सॅनिटायझर आत आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी, स्वच्छतागृहांमध्ये तसेच इतर ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये येणारे प्रेक्षक कुठेही थुंकणार नाही याची तपासणी करणे, आणि आत येणाऱ्या प्रेक्षकांचे थर्मल चेकअप करणे आवश्यक आहे. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. याशिवाय प्रेक्षकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रेक्षकांनी ठराविक ठिकाणी कसे उभे राहावे याबाबत आखणी करण्यात यावी. तसेच सिनेमागृहांमध्ये बाहेर पडत असताना गर्दी होणार नाही याची काळजी सुद्धा घेणे आवश्यक आहे.

मल्टीप्लेक्समध्ये अनेक सिनेमे वेगवेगळ्या पडद्यांवर दाखवले जातात, अशावेळी मध्यांतर एकाच वेळी येणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरुन प्रेक्षकांची गर्दी होणार नाही.सिनेमागृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी जसे खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी कार्यरत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे सुद्धा लसीकरण करणे आवश्यक आहे. शॉपिंग मॉलमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण हे नियम ठरिवण्यात आले असले तरी मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मूक प्राण्यांवर होणारा अन्याय थांबवावा; भारतीय शाकाहार संघ आणि गौ-सेवा परिवाराच्या वतीने प्रांतधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत -राज्यपाल

Next Post
विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत -राज्यपाल

विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत -राज्यपाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d