Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुक्ताईनगर नगरपंचायत तर्फे निर्जंतुकीकरण फवारणी ला सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुक्ताईनगर नगरपंचायत तर्फे निर्जंतुकीकरण फवारणी ला सुरुवात

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग कोविड१९ विलगीकरण कक्षात मुंबई व पुणे येथून व विदेशातून आलेल्या दोघांनी असे एकूण ११५२ लोकांनी इन्फ्रारेड स्क्रिनिंग थर्मामिटरद्वारे तपासणी केली प्रत्येकाच्या हातावर होम क्वारंटाईन ( घरातील लोकांसह कोणाच्याही संपर्कात न राहता स्वतंत्र खोलीत राहणे ) असे शिक्के मारण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात जरी कोरोनाचे लक्षणे दिसून आलेली नाहीत तरीही ही लक्षणे लगेच दिसून येत नसल्याने खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने या लोकांना वेगळे राहण्याचा सल्ला दिला आहे. अशात येथील मुक्ताईनगर नगरपंचायत तर्फे शहरातील गटारींवर कार्बोलीक पावडर टाकण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. यात भरीसभर शहरातील प्रत्येक भाग निर्जंतुकीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या आदेशाने पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेप्रमाणे मिनी ट्रॅक्टरवर निर्जंतुकीकरण फवारणी मशीन बसवून शहरात प्रभाग वाईज फवारणी सुरू करण्यात आली असून प्रभाग क्र.१७ मध्ये दि २५मार्च पासून ही फवारणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, नगराध्यक्षा नजमा तडवी, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, माजी सरपंच प्रवीण पाटील, माजी उपसरपंच आसिफ बागवान व नगरपंचायत कर्मचारी सचिन काठोके, इतर कर्मचारी तसेच पत्रकार संदीप जोगी उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

रायपूर येथे जनजागृती समितीद्वारा “कोरोना” बाबत मार्गदर्शन

Next Post

जामनेर येथील मयूर प्रोव्हीजन्सवर प्रशासन कारवाई करणार का?

Next Post
जामनेर येथील मयूर प्रोव्हीजन्सवर प्रशासन कारवाई करणार का?

जामनेर येथील मयूर प्रोव्हीजन्सवर प्रशासन कारवाई करणार का?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d