Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत संमेलनात होणार लेखक, भाषा आणि लोकशाही विषयावर परिसंवाद

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे आता ‘चॅटबॉट’द्वारे एका क्लिकवर

नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- भारत निवडणूक आयोगाच्या अधिनस्थ कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच ‘लेखक, भाषा आणि लोकशाही’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नागरीकांनी पॉलिटेक्निक बिल्डींग येथील उपमंडप या ठिकाणी ४ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत या परिसंवादात उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जिल्ह्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे होणारा परिसंवाद Chief Electoral Officer Maharashtra या फेसबुक पानावरून आणि https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरूनही ऑनलाईन स्वरूपात पाहता येणार आहे.

या संमेलनाच्या माध्यमातून मतदाराच्या जनजागृतीसंबंधी प्रकाशने आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खेळ यांचे दालनही असणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसंबंधी निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंच ही व्यासपीठे तयार केली आहेत. यासंबंधी व्यासपीठे, शाळा- महाविद्यालये, गावा-परिसरांमध्ये, कार्यालयामध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तिकाही या दालनात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने या दालनाला भेट देऊन लोकशाही संबंधीचे ल्युडो, सापशिडी यांसारखे खेळ तसेच व्यासपीठे समजून घ्यावीत, असेही उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, यासाठी समाजातील सर्जनशील घटक विविध पातळ्यांवर काम करत असतात. लेखक हा सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा घटक आहे.

लेखक आणि त्याची लेखणी व त्यांची हीच भूमिका केंद्रस्थानी ठेवून या परिसंवादात ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, मराठी भाषेच्या चळवळीतले प्रा. कौतिकराव ढाले-पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, पत्रकार आणि संपादक इब्राहीम अफगाण व दीप्ती राऊत, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी मान्यवर यात सहभागी होणार आहे. या परिसंवादाचे सूत्रसंचालन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार करणार असल्याचेही उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर

Next Post

बचतगटातील महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठेसाठी वर्ल्ड एक्सपो दुबई येथे ‘माविम’चे कंपन्यासोबत सामंजस्य करार

Next Post
‘उमेद’ अभियानाअंर्तगत महिला बचतगटांना ‘गोट बँके’चा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा -महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

बचतगटातील महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठेसाठी वर्ल्ड एक्सपो दुबई येथे ‘माविम’चे कंपन्यासोबत सामंजस्य करार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d