Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलगा रुद्रप्रतापच्या वाढदिवसानिमित्ताने ललिता बाबर आणि डॉ.संदीप भोसले यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस केली ५० हजार रुपयांची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 2 mins read
मुलगा रुद्रप्रतापच्या वाढदिवसानिमित्ताने ललिता बाबर आणि डॉ.संदीप भोसले यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस केली ५० हजार रुपयांची मदत

मुंबई : भारतीय महसुली सेवेत कार्यरत असलेले डॉ.संदीप भोसले आणि रिओ ऑलिम्पिकची फायनल गाठणारी मराठमोळी धावपटू ललिता बाबर या दाम्पत्याने आपल्या मुलाच्या म्हणजे रुद्रप्रताप ऊर्फ शंभुराजे याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० हजार रुपयांची मदत केली आहे.

Maha Info Corona Website

मुख्यमंत्र्यांकडून आभार आणि शुभाशिर्वाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुद्रप्रतापला त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभाशिर्वाद दिले आहेत तसेच भोसले-बाबर दाम्पत्याने मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, श्रीमती बाबर यांनी राज्य आणि देशाचा नावलौकिक वाढवला असून संयम, शिस्त आणि मेहनतीच्याबळावर त्यांनी स्वत:च्या आयुष्यात यश संपादन केले आहे. आज अशाच संयम, शिस्त आणि समाजासाठीच्या समर्पणाची गरज आहे… एकजुटीने आपल्याला या संकटाचा मुकाबला करायचा आहे. स्वत:बरोबर घरातील वडिलधाऱ्यांची आणि बालकांची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता, स्वयंशिस्त आणि शारीरिक अंतराचा निकष पाळायचा आणि कोरोनाला हरवायचं आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी माहिती खालीलप्रमाणे आहे –

इंग्रजीत-

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch, 

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.  या खात्यात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे १९ रुग्ण

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली

Next Post
..व्रतस्थाची सावली हरपली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d