Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

जळगाव, दि. 12 (जिमाका) – यावल वन विभागाच्यावतीने 10 मार्च, 2021 रोजी वनसंरक्षक, धुळे (प्रादेशिक), डी. डब्लु. पगार व उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव पद्मनाभा एच.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा व्ही.एच.पवार यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व्ही. व्ही. कुटे व वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रादेशिक) डी. एच. लोंढे व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासह शेख मुखतार शेख युसुफ रा. मन्यार मळी, हमीद नगर, चोपडा येथे गोपनीय पद्धतीने अचानक सकाळी 10 वाजता वरीष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जावून आकस्मित धाडसत्र राबिवले.

या धाडसत्रात बाभूळ, निलगीरी, निम व इतर असे एकूण 13 घनमीटर माल आढळून आल्याने तो जप्त करुन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा केला. तसेच 18 इंच व्यासाचे विना परवाना उभे आरायंत्र आढल्याने सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या समक्ष व वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा (प्रादेशिक) यांच्या उपस्थितीत नियमांनुसार पंचनामा करुन ते जप्त करण्यात येऊन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही केल्याने अवैध लाकूड व्यापारी तथा व्यवसायीकांमध्ये दहशत तयार झालेली असून या कार्यवाहीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली. या कार्यवाहीनुसार वनगुन्हाची नोंद घेत पुढील तपास सुरु आहे. असे यावल वन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार

Next Post

जागतिक ग्राहक दिनानिमित्त सोमवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

Next Post
जागतिक ग्राहक दिनानिमित्त सोमवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक ग्राहक दिनानिमित्त सोमवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d