Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवकांनी नेहरू युवा केंद्राच्या व्यासपीठाचा फायदा घ्यावा!खा.उन्मेष पाटील यांचे आवाहन : नेहरू युवा केंद्रातर्फे युवक मंडळांना क्रीडा साहित्य वाटप जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
युवकांनी नेहरू युवा केंद्राच्या व्यासपीठाचा फायदा घ्यावा!खा.उन्मेष पाटील यांचे आवाहन : नेहरू युवा केंद्रातर्फे युवक मंडळांना क्रीडा साहित्य वाटप जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव, दि.२७ – नशिबाने केवळ एक टक्का युवक यशस्वी होऊ शकतो तर ९९ टक्के युवक प्रयत्नांनी यशस्वी होतो. यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे नशीबाच्या विचारात अडकून आपण स्वतःची फसवणूक करू नका. युवकांनो आपले ध्येय निश्चित करावे जो खेलेगा वही खीलेगा त्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवा. येत्या काळात कोरोना संपला की युवकांसाठी दोन दिवसीय नेहरू युवा केंद्राचे शिबीर आयोजित करू. जळगावचे केंद्र देशात सर्वोत्तम ठरेल यासाठी माझे प्रयत्न राहतील. सर्वांना आपल्या शालेय जीवनात चांगले व्यासपीठ उपलब्ध होत नाही त्यामुळे आपल्याला नेहरू युवा केंद्राचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे त्याचा चांगला फायदा करून घ्या असे आवाहन खा.उन्मेष पाटील यांनी केले.

केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आज रविवारी जिल्ह्यातील ३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिवतीर्थ मैदान येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार उन्मेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भाजपा जळगाव जिल्हाअध्यक्ष तथा आ.राजुमामा भोळे उपस्थित होते. व्यासपीठावर गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

पाहुण्यांचा परिचय भूषण लाडवंजारी यांनी करून दिला. प्रस्तावना करताना नेहरू युवा केंद्र जळगावचे समन्वयक नरेंद्र डागर यांनी सांगितले की, सध्या फिट इंडिया उपक्रम देशभर राबविला जात आहे. तुम्ही फिट राहणार तर मन फिट राहील. आपण स्वतः फिट रहा इतरांना प्रोत्साहित करा. नेहरू युवा केंद्र हा केंद्र शासनाचा उपक्रम असून तरुणांना घडविण्यासाठी नेहमी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात अशी माहिती देऊन त्यांनी प्रोजेक्टरवर काही स्लाइड्सच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती नरेंद्र डागर यांनी दिली. सूत्रसंचालन विकास वाघ याने केले तर विनोद ढगे यांनी आभार मानले.

युवकांनी स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवत शरीर तंदरूस्त ठेवावे : आ.भोळे

प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले की, आपण निसर्गाशी खेळलो म्हणून आज निसर्ग आपल्याशी खेळतो आहे. अगोदर मनुष्य प्लास्टिक बाहेर फेकायचा आता मनुष्याला प्लास्टिकमध्ये जाळावे लागत आहे. नेहरू युवा केंद्र व केंद्र सरकार आणि तरुणांमध्ये दुवा म्हणून कार्य करते. आपण समाजाचे देणं लागतो या उदात्त भावनेतून कार्य करा. प्रत्येकाने रोज शरीरासाठी तासभर वेळ द्यावा. घरी किंवा बाहेर जाऊन व्यायाम करा. ग्रामीण खेळ रांगडी खेळ होते. ते आज लुप्त होत चालले होते परंतु त्यापैकी काही खेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा जिवंत केले. तरुणांनी व्यसनापासून लांब राहावे आणि स्वतःला तंदरूस्त ठेवावे, असे आवाहन आ.भोळे यांनी केले. तसेच सर्वप्रथम आपण जिंकायचं कुणाशी हे ओळखायला शिकावे. जर ते लक्षात आले तर आपल्याला आयुष्यात यश नक्की मिळेल. देश आपली आई आहे त्यामुळे आपल्या आईसाठी काही चांगले काम करताना कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करा असे आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले.

गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी सांगितले की, नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासह नेतृत्वगुण विकास साधला जातो. नेतृत्व करीत एकमेकांना साहाय्य करायचे. ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारचा इतका मोठा उपक्रम असेल तर त्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एखादा मोठा कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करावी, अशी अपेक्षा गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी व्यक्त केली.

विनोद ढगे यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात एक सामाजिक चळवळ उभारण्याचे काम नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागात पोहचविण्याचे काम या माध्यमातून सुरू आहे. कोरोना काळात देखील स्वयंसेवकांनी जनजागृती करण्याचे काम मोठ्याप्रमाणात केली. तरुणांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा, स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदृढ राहावे या उद्देशाने नेहमी विविध उपक्रम नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येतात. कार्यक्रमाचे उद्घाटन खा.उन्मेष पाटील पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा युवा शब्द येतो तेव्हा तो आपला शब्द वाटतो. युवा शब्दाने एक वेगळी प्रेरणा मिळते. एका बाजूला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान घेतांना आपण आव्हान देखील स्वीकारायला हवे. देश खऱ्या अर्थाने जगात पुढे जाणार असेल तर तो युवकांच्या बळावर जाईल त्यामुळे आपली जबाबदारी फार महत्वाची आहे. नेहरू युवा केंद्रासोबत काम करताना आपण स्वतः उत्स्फूर्त असायला हवे. शेकडो तरुणांना नेतृत्त्व, प्रेरणा देणारे आपण विविध संस्थांचे प्रतिनिधी आहोत. आपण आपल्या आणि युवकांच्या विकासासाठी एक ऍक्शन प्लॅन तयार करा. घरात बसून स्वप्न पूर्ण होत नाही, सहभाग घ्या, ध्येय निश्चित करा. आपण जबाबदारी घ्यायला हवी, दोन पाऊले पुढे जायला हवे. आपण मनाने तरुण असायला हवे जर मनाने थकलेले असाल तर काहीही साध्य होऊ शकत नाही, असे खा.उन्मेष पाटील यांनी सांगितले.

३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील ३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यात बुद्धिबळ पट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, नेट, बॅटमिंटन रॅकेट, शटल कॉक यांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक आकाश धनगर, संजय बाविस्कर, शाहरुख पिंजारी, हितेश ओत्सवाल, शिवदास कोचुरे, रणजितसिंग राजपूत, दीपक सपकाळे, प्रशांत बाविस्कर, नाना सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ४१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d