Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई(प्रतिनिधी)- रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरून रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या रक्तदान महायज्ञ रॅलीचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे स्वागत केले व रॅलीला पुढील प्रवासासाठी झेंडा दाखवून रवाना केले.

नागपूर येथील देवता लाईफ फाउंडेशन संस्थेतर्फे आयोजित राज्यव्यापी रॅलीच्या सदस्यांनी फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना रक्तदान महायज्ञ रॅलीची माहिती दिली.यावेळी संस्थेच्या विश्वस्त निलिमा बावणे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री विवेक जुगादे, संजय पेंडसे, सारिका पेंडसे, छायाचित्रकार शेखर सोनी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी या संपूर्ण रॅलीच्या पार्श्वभूमीची माहिती राज्यपालांसमोर सादर केली. किशोर बावणे व संस्थेच्या विश्वस्त नीलिमा बावणे यांनी मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन राज्यपालांचा सत्कार केला.आज समाजात सेवाभावाने कार्य करणाऱ्या लोकांची कमी आहे. अनेकदा लोक प्रसिद्धीसाठी काम करतात. परंतु पद व पैसा या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत. त्याउलट अंतःकरणातून मिळालेले आशीर्वाद स्थायी असतात. त्यामुळे समाजातील पीडित, दुःखी, अपंग व आजारी लोकांना देव मानून त्यांची सेवा केली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.

राज्यव्यापी रॅलीमुळे राज्यभ्रमणही होईल व सोबत रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होईल असे सांगताना संस्थेने वर्षानुवर्षे काम करीत रहावे व रक्तदानाचे कार्य चिरंजीवी व्हावे या शब्दात राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.करोना काळात लोक रक्तदान कमी झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा पडला होता. लोकांच्या मनात रक्तदानाबाबत भीती निर्माण झाली होती.

रक्तदान महायज्ञाच्या माध्यमातून 12 जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून 15 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात रक्तदानाबाबत जनजागृती केली जाईल तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती विवेक जुगादे यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवता लाइफ फाउंडेशनच्या उपाध्यक्ष कस्तुरी बावणे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवता लाइफ फाउंडेशनचे सल्लागार विवेक जुगादे यांनी केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जनतेच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पातून व्यक्त व्हावे; लोकप्रतिनिधींनी आवडत्या विषयांचा अभ्यास करावा -उद्योगमंत्री सुभाष देसाई

Next Post

मालीच्या वाणिज्यदूतांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट; कृषि माल प्रक्रिया, शीतगृह उभारणी आणि निर्यातीवर चर्चा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d