उद्योजक, व्यावसायिकांना पुढे येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई , दि. २१:- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना पाठबळ म्हणून निधी उभारण्यात येत आहे. यासाठी आता शासनाने “महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ” या नावाने स्वतंत्र बैंक खाते उघडले असून उद्योजक, व्यावसायिकांनी या निधीत सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) उदारपणे योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


साथीच्या रोगाच्या समस्येने संपूर्ण जग व्यापून टाकले आहे. जगभरातील कोटयावधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्र शासनास मदत देण्यासाठी उस्फुर्त आणि असंख्य विनंत्या प्राप्त होत आहेत. या विनंतीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ” महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ” या नावाने स्वतंत्र बैंक खाते स्टेट बैंक ऑफ इंडिया, कुलाबा,मुंबई येथे उघडले आहे. आपत्तीचा सामना समर्थपणे करण्यासाठी हा निधी/फंड राज्यास निश्चितपणे उपयक्त ठरेल. उदयोगांचे सामाजिक दायित्व निधी (Corporate Social Responsibility) मधून उद्योग जगताकडून भरघोस निधी या खात्यामध्ये देणगीव्दारे जमा करावा असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. या खात्यामध्ये जमा करण्यात येणारा निधी कंपनी अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार सीएसआर साठी पात्र आहे.

बँक खात्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

खात्याचे नाव :- महाराष्ट स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी

बँक खाते क्रमांक :- 39265578866

बँकेचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, वुड हाऊस रोड, कुलाबा, मुंबई .

ब्रँच कोड :- 572

आयएफएससी (IFSC) :- SBIN0000572

एमआयसीआर (MICR):- 400002087

Government of Maharashtra appeal to Corporates for generous contribution towards CSR account for Disaster Management.

A bank account has been opened to mobilize CSR fund under MAHARASHTRA STATE DISASTER MANAGEMENT AUTHORITY, which is an eligible entry to receive CSR funds towards Disaster Management, for COVID-19 and other Natural Calamities management and containment.

The Bank details are as below:

Account Name:- MAHARASHTRA STATE DISASTER MANAGEMENT AUTHORITY

Account Number :- 39265578866

Name of Bank:- STATE BANK OF INDIA, WODEHOUSE ROAD (COLABA), MUMBAI.

Branch Code :- 572

IFSC :- SBIN0000572

MICR :- 400002087

For any query, please contact 02222027990 / 22023039 .










