मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांच्यातर्फे मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनी परिसरातील स्मशानभूमी रस्त्यावर सामाजिक अंतर ठेवून मोठ्या वृक्षांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
संदीप कदम, सुनिल सावंत, प्रसन्न केळकर, भारती पाटील इत्यादींच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. टाटा कॉलनीतील किरण गमरे, श्रीकांत पवार, अशोक परब यांनी देखील यावेळी उपस्थिती लावली. ‘झाडे वाढवा, झाडे जगवा व पर्यावरणाचे रक्षण करा’ हा संदेश यावेळी देण्यात आला. मनसेचे समस्त महिला व पुरुष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.










