Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/09/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

जळगाव – (प्रतिनिधी) – तालुक्यातील रामदेववाडी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल आणि इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्राथमिक शाळा रामदेववाडी तांडा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. यात 120 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी रोटरी रॉयलचे अध्यक्षा डॉ. वर्षा रंगलानी यांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी, ब्रश कसा करावा आणि दातांच्या आरोग्यासाठी पोषक आहार कसा असावा या संदर्भात मार्गदर्शन केले. ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत सांगितले. डॉ. नितीन  विसपूते यांनी व्यसनांचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तंबाखू, गुटखा, सुपारी यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. डॉ. बिंदू छाबडा यांनी विद्यार्थ्यांना हाताधुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

रोटरी क्लब रॉयल यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना ब्रश आणि बिस्कीट वाटप केले.  डॉ. जयदिपसिंग छाबडा, नितीन मंधान, पिंकी मंधान, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. निशा तलरेजा, आणि सिमा मुलानी यांनी दंत चिकित्सक शिबिरासाठी सेवा दिली. ज्यांना दंतचिकित्सक विषयी समस्या होत्या, त्यांना पुढील उपचारासाठी टोकन देण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक विक्रम अस्वार हे मौखीक आरोग्याच्या दृष्टाने समस्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत माहिती पोहचविणार आहे.  प्रशांत सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. जि.प. शाळेच्या शिक्षिका रत्नप्रभा वाणी, कल्पना सपकाळे, हर्षा तायडे, पुनम बागुल यांनी शिबिराच्या व्यवस्थापनासाठी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतीगृहात महिला आयोगाच्या अध्यक्ष जातात तेंव्हा….!!

Next Post

जामनेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांची गुणवत्ता वाढणार;शेंदूर्णी,वाकोद,वाकडी चा प्रथम टप्प्यात समावेश

Next Post
जामनेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांची गुणवत्ता वाढणार;शेंदूर्णी,वाकोद,वाकडी चा प्रथम टप्प्यात समावेश

जामनेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांची गुणवत्ता वाढणार;शेंदूर्णी,वाकोद,वाकडी चा प्रथम टप्प्यात समावेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d