Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रायसोनीत युवा महोत्सव “अंतराग्नी”ची धूम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/03/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
रायसोनीत युवा महोत्सव “अंतराग्नी”ची धूम

वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात समारोप ; ५०० विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

जळगाव, ता. ५ : जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे “अंतराग्नी” वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ‘भारतातील संस्कृती’ या विषयावरील कार्यक्रम सादर झाले तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रायसोनी इस्टीट्यूट गेली अनेक वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करीत असून या इस्टीट्यूट मधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर आहेत. सध्या महाविध्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून इस्टीट्यूटचे व आपल्या शहराचे नाव उज्ज्वल करावे, असे रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी यावेळी सांगितले. मोह मोह के धागे, मेरे कॉलेज की लडकी, झिंग झिंग झिंगाट, एक राधा एक मीरा, राधा ही बावरी, नवरी नटली, तनहाई तनहाई, अच्छा चलते है दुवा वो मे याद रखना, अशी विविध बहारदार गीतांवर नृत्य व गायन स्पर्धेत स्पर्धकांनी बहारदार सादरीकरण केले. यावेळी स्पर्धक व प्रेक्षक विद्यार्थ्यांनी एकच ठेका धरला. अंतराग्नीचे विशेष आकर्षण ठरले शिवाजी महाराजांचा “अफजल खानाचा वद” हा पोवाडा. पोवाड्याच्या थरारक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी प्रेकाक्षकांची चांगलीच दाद मिळविली. यावेळी नृत्य, गीत गायन, कल का नायक व केस स्टडी, अंताक्षरी, फेस पेंटिंग, रांगोळी, पोस्टर सादरीकरण या स्पर्धांमध्ये ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी एकल नृत्य, समूह नृत्य, रॅम्प वॉक या स्पर्धा जल्लोषात पार पडल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायसोनी इस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल उपस्थित होते.

कल का नायक या स्पर्धेत बेरोजगारी, शिक्षणाचे महत्व, पाणी प्रश्न, मतदान अधिकार, पर्यावरण सुरक्षा, लव मेरेज की अरेंज मेरेज, सामाजिक जबाबदारी, मानवी स्वभाव व वर्तणूक अशा अनेक विषयांवर चित्रफिती दाखवून स्पर्धकांना त्याविषयी आपले मत व्यक्त करायचे होते. एखाद्या विषयावर त्याच क्षणाला आपले मत व्यक्त करणे ही खूप कसरतीचे काम आहे. परंतु विद्यार्थ्यांची विचार क्षमता व संवाद सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून चुरशीने स्पर्धा खेळल्या. विध्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास साध्य व्हावा, सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे, सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती जाणीव निमार्ण व्हावी या उद्देशाने ह्या स्पर्धा घेण्यात आले होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी “अंतराग्नी” या वार्षिक स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. वसिम पटेल, प्रा. राकेश तिवारी, प्रा. अविनाश पांचाळ, प्रा. सौरभ नाईक, प्रा. सोनल पाटील, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. हरीश भंगाळे, प्रा. हर्षल पाटील, प्रा. आयेशा सय्यद, प्रा. हिरालाल साळुंके, प्रा.राहुल त्रिवेदी, व  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Next Post

प. वि. पाटील विद्यालयात केली कचऱ्याची होळी

Next Post

प. वि. पाटील विद्यालयात केली कचऱ्याची होळी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d